Home /News /sport /

IND vs SA : इशांत शर्माचा आदर करा, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

IND vs SA : इशांत शर्माचा आदर करा, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये (India vs South Africa) अनुभवी बॉलर इशांत शर्माला (Ishant Sharma) एकाही मॅचमध्ये संधी मिळाली नाही.

    मुंबई, 14 जानेवारी : इशांत शर्मानं (Ishant Sharma) मोठ्या कष्टानं क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम बॉलर्सच्या यादीत प्रवेश केला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात टीम इंडियाने मिळवलेल्या यशात इशांतचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याने जसप्रीत बुमराह  (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) सोबत उत्तम पार्टनरशिप केली आहे. बुमराह आणि शमी सध्या टीम इंडियाचे महत्त्वाचे बॉलर आहेत. तर गेल्या काही महिन्यात इशांतकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs South Africa) इशांतला एकाही मॅचमध्ये संधी मिळाली नाही. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) जखमी झाल्यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये इशांतला संधी मिळेल असा अंदाज होता, पण मॅनेजमेंटने सिराजच्या जागेवर उमेश यादवला (Umesh Yadav) खेळवले. टीममधील इशांतचे महत्त्व कमी झाले आहे. त्या परिस्थितीमध्ये टीम मॅनेजमेंटने इशांतशी प्रामाणिकपणे चर्चा करावी, असं मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन आणि दिग्गज फास्ट बॉलर शॉन पोलॉकनं (Shaun Pollock) व्यक्त केले आहे. 'क्रिकबझ'शी बोलताना त्याने ही मागणी केली. 'माझ्या मते कम्युनिकेशन उत्तम हवे. इशांतने भारतीय टीमसाठी जे केलंय  त्याबद्दल त्याचा आदर करण्याची गरज आहे. इशांतला प्रामाणिकपणे योग्य कारण सांगण्याची गरज आहे. टीम इंडियासाठी इतकं क्रिकेट खेळल्यानंतर अनुकूल परिस्थितीमध्ये बेंचवर बसणे त्याच्यासाठी सोपे नसेल,' असे मत पोलॉकने यावेळी व्यक्त केले. क्रिकेटवर कोरोनाचं सावट कायम, बड्या देशांमधील मालिका संकटात इशांत शर्मानं 2007 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 105 टेस्टमध्ये 311 विकेट्स घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात तो संयुक्तपणे भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, South africa, Team india

    पुढील बातम्या