मुंबई, 14 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील केपटाऊन टेस्टचा चौथा दिवस टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होणार की नाही, हे आज (शुक्रवार) ठरणार आहे. भारतीय टीम ऐतिहासिक विजयापासून 8 विकेट दूर आहे. तर दक्षिण आफ्रिकेला ही टेस्ट जिंकण्यासाठी आणखी 111 रन आवश्यक आहेत. यजमान दक्षिण आफ्रिकेचं पारडं सध्या जड आहे. तसं असलं तरी, टीम इंडियाकडे मॅच फिरवण्याची क्षमता आहे.
जसप्रीत बुमराह (Jaspirt Bumrah) आणि मोहम्मद शामी (Mohammed Shami) या दोघांच्या बॉलिंगव टीम इंडियाचे भवितव्य ठरणार आहे. भारताच्या या अव्वल बॉलर्सनी या सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली आहे. आता शेवटच्या दिवशी त्यांनी चमत्कार करावा अशी टीमची अपेक्षा असेल. बुमराहनं तिसऱ्या दिवसााच्या शेवटच्या बॉलवर दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गारचा अडथळा दूर केला आहे.
जोहान्सबर्ग टेस्टमध्ये टीम इंडियाच्या विजयात आडवी आलेली एल्गारची भिंत आता पडली आहे. भारतीय बॉलर्ससाठी चौथ्या दिवशी सकाळचे सेशन निर्णायक ठरणार आहे. पहिल्या तासाभरातील अनुकूल परिस्थितीचा फायदा घेत आफ्रिकेच्या जास्तीत जास्त विकेट्स घेण्याचे टीम इंडियाचे ध्येय असेल. दक्षिण आफ्रिकेचा पीटरसन टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. तिसऱ्या दिवसअखेरीस नाबाद असलेल्या पीटरसनला झटपट आऊट केले तर आफ्रिकेवर दबाव येऊ शकतो.
इतिहासाची साथ
शमी-बुमराह जोडीला त्यांच्या यापूर्वीच्या कामगिरीचा इतिहास चौथ्या दिवशी जिंकण्याचे प्रयत्न करण्यासाठी बळ देणार आहे. चार वर्षांपूर्वी याच जोडीने वाँडर्सवर आफ्रिकेला 194 आणि 177 रनवर ऑल आऊट केले होते. त्यांच्या बॉलिंगमुळे टीम इंडियाने ती टेस्ट 63 रनने जिंकली होती. या दौऱ्यात सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये आफ्रिकेच्या दोन्ही इनिंग 200 रनच्या आत संपुष्टात आल्या होत्या. या इनिंगमध्येही दोघांनी एक-एक विकेट घेतली आहे. त्यामुळे त्यांना सुरुवात मिळाली आहे. आता चौथ्या दिवशी जुन्या कामगिरीपासून प्रेरणा घेत त्यांनी बॉलिंग केली तर टीम इंडियाचा विजय नक्की आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Jasprit bumrah, South africa, Team india