जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / बॅटींग करताना माझ्या छातीमध्ये... मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये गेलेल्या क्रिकेटपटूनं सांगितला 'तो' अनुभव

बॅटींग करताना माझ्या छातीमध्ये... मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये गेलेल्या क्रिकेटपटूनं सांगितला 'तो' अनुभव

बॅटींग करताना माझ्या छातीमध्ये... मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये गेलेल्या क्रिकेटपटूनं सांगितला 'तो' अनुभव

पाकिस्तानचा क्रिकेटपटू आबिद अलीला (Abid Ali) एक्यूट कोरोनरी सिंड्रोम’ (ह्रदयातील धमन्यांचा आजार) झाला होता. आबिदनं त्या दिवशी नेमकं काय घडलं तो सर्व अनुभव सांगितला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जानेवारी : पाकिस्तानचा क्रिकेटपटू आबिद अलीला (Abid Ali) एक्यूट कोरोनरी सिंड्रोम’ (ह्रदयातील धमन्यांचा आजार) झाला होता. काही दिवसांपूर्वी कायद-ए-आझम ट्रॉफी स्पर्धेत बॅटींग करताना आबिदला हा त्रास जाणवू लागला. त्यानंततर त्यााच्यावर उपचार करण्यात आले. त्याला आता नवं आयुष्य मिळालं आहे. आबिदनं त्या दिवशी नेमकं काय घडलं तो सर्व अनुभव सांगितला आहे. आबिदची त्यानंतर स्थानिक हॉस्टिपटलमध्ये  ‘एंजियोप्लास्टी’ झाली. मोठ्या आजारपणानंतरही त्याची खेळण्याची जिद्द कायम आहे. लवकरच टीममध्ये परतण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. ‘बॅटींग करताना मला अस्वस्थ वाटत होते, तसेच छातीत कळ येत होती. क्रिकेटमधील दुसऱ्या इनिंगप्रमाणेच अल्लाहने मला दुसरं आयुष्य दिले आहे.’ अशी प्रतिक्रिया आबिदने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्यक्त केली आहे. ‘मला बॅटींग करताना त्रास खूपच वाढला होता. मी सहकारी अझर अलीचा सल्ला घेतला. त्यानंतर अंपायरच्या परवानगीने मैदान सोडले. मी बाऊंड्री लाईनजवळ गेल्यावर मला उल्टी झाली, तसेच चक्कर येत होती. टीमच्या फिजिओ तात्काळ माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेले. U19 वर्ल्ड कपचा आजपासून थरार, भारतासह 4 टीम विजेतेपदाच्या दावेदार हॉस्पिटलमध्ये ईसीजी करण्यात आला. त्याचा रिपोर्ट चिंताजनक होता. सामान्य व्यक्तीचे ह्रदय 55 टक्के काम करते. माझे 30 टक्के काम करत होते. त्यानंतर माझ्यावर उपचार करण्यात आले. पीसीबीने माझ्या उपचारासाठी खास योजना तयार केली आहे, असे आबिदने यावेळी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात