मुंबई, 13 जानेवारी : आयपीएल स्पर्धेच्या आगामी सिझनपूर्वी (IPL 2022) होणाऱ्या मेगा ऑक्शनची (IPL 2022 Mega Auction) तयारी सध्या सुरू आहे. लखनऊ (Lucknow franchise) आणि अहमदाबाद (Ahmedabad franchise) शहरांच्या टीम आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणार आहेत. या दोन्ही टीमना ऑक्शनपूर्वी 3 खेळाडूंना ड्राफ्टच्या माध्यमातून निवडण्याची संधी आहे. त्यानंतर उर्वरित सर्व खेळाडूंचा समावेश मेगा ऑक्शनमध्ये होणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूत हे ऑक्शन होणार आहे. ‘क्रिकबझ’ ने दिलेल्या वृत्तानुसार लखनऊ आणि अहमदाबाद या टीमला 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खेळाडूंना करारबद्ध करण्याची मुदत दिलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार केएल राहुल (KL Rahul) लखनऊ टीमचा कॅप्टन असेल. तर डेव्हिड वॉर्नरला (David Warner) देखील लखनऊ करारबद्ध करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अहमदाबाद टीमचा कॅप्टन असेल. तर राशिद खान (Rashid Khan) आणि इशान किशन (Ishan Kishan) देखील या टीमकडून खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या सगळ्या टीमची पर्स 90 कोटी रुपयांची करण्यात आली आहे, ज्यामुळे टीमना खेळाडूंवर अधिक पैसे खर्च करता येणार आहेत. मागच्या मोसमापर्यंत ही रक्कम 85 कोटी रुपये होती. एक टीम कमीत कमी 18 तर जास्तीत जास्त 25 खेळाडू विकत घेऊ शकते. IND vs SA : दर 4 टेस्टनंतर बुमराह करतोय कमाल, कपिल देव यांना टाकले मागे यापूर्वी रिटेन करण्यात आलेले 27 खेळाडू आरसीबी (RCB): विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians): रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals): संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जायसवाल. चेन्नई सुपरकिंग्स (CSK): एमएस धोनी, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad): केन विलियमसन, अब्दुल समद आणि उमरान मलिक. पंजाब किंग्स (Punjab Kings): मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंह. केकेआर (KKR): आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals): ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि एनरिक नॉर्किया.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.