केपटाऊन, 9 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरी टेस्ट केपटाऊनमध्ये होणार आहे. या टेस्टसाठी टीम इंडिया शनिवारी केपटाऊनमध्ये दाखल झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आल्याचे दिसत आहे. हॉटेलच्या बाहेर ड्रम वाजवत तसेच नाचत स्थानिक कलाकारांनी टीम इंडियाचे स्वागत केले. टीम इंडिया कोरोना प्रोटोकॉलनुसार स्पेशल विमानाने जोहान्सबर्गहून केपटाऊनमध्ये दाखल झाली. खेळाडूंनी हा प्रवास कसा केला हे देखील या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. दुसरी टेस्ट गमावल्यानंतर भारतीय टीम विजयाच्या निर्धाराने केपटाऊन टेस्टमध्ये उतरणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) दुसरी टेस्ट खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) टीमचा कॅप्टन होता. भारतीय टीमला या मॅचमध्ये 7 विकेट्सनं पराभव स्विकारावा लागला. आता यजमान टीमनं मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. टीम इंडियाने सेंच्युरियनमध्ये झालेली पहिली टेस्ट जिंकली होती. त्यामुळे आता केपटाऊनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे.
Touchdown Cape Town 📍🇿🇦#TeamIndia #SAvIND pic.twitter.com/TpMtyPK9FG
— BCCI (@BCCI) January 8, 2022
केपटाऊन टेस्टमध्ये विराट कोहली खेळणार हे नक्की आहे. त्याच्या जागी कुणाला वगळण्यात येते याची उत्सुकता आहे. फास्ट बॉलर मोहम्मद सिराजचा दुखापतीमुळे या टेस्टमधील सहभाग अनिश्चित आहे. त्याच्या जागी उमेश यादव किंवा इशांत शर्माचा टीममध्ये समावेश होऊ शकतो. होय, हे शक्य आहे! न्यूझीलंडच्या खेळाडूने काढले 1 बॉलमध्ये 7 रन, पाहा VIDEO टीम इंडियाने आजवर दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. यंदा नवा इतिहास रचण्यासाठी भारतीय टीमला केपटाऊनमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे.