Home /News /sport /

IND vs SA : भारतीय खेळाडू दबावात असल्याचे सिद्ध! 'त्या' घटनेवरून आफ्रिकेचा पलटवार

IND vs SA : भारतीय खेळाडू दबावात असल्याचे सिद्ध! 'त्या' घटनेवरून आफ्रिकेचा पलटवार

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील केपटाऊन टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी मैदानात वाद रंगला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गार (Dean Elgar) याच्या एलबीडब्ल्यूवरून हा वाद सुरू झाला.

    मुंबई, 14 जानेवारी :  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील केपटाऊन टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी मैदानात वाद रंगला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गार (Dean Elgar) याच्या एलबीडब्ल्यूवरून हा वाद सुरू झाला. त्यानंतर कॅप्टन विराट कोहलीसह (Virat Kohli) भारतीय खेळाडूंनी त्या घटनेवर राग व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणावर दक्षिण आफ्रिका टीममधून पहिली प्रतिक्रिया आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर लुंगी एन्गिडीनं (Lungi Ngidi) भारतीय टीम निराश आणि दबावात असल्याचा दावा केला आहे. तो तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत होता. 'माझ्या मते या प्रकारच्या घटनेतून थोडी निराशा दिसत आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंची मनस्थिती आपण स्पष्टपणे पाहू शकतो. ते दबावात असल्याचं दिसत आहे. त्यांना आमची चांगली पार्टनरशिप (डीन एल्गार आणि किगन पीटरसन) तोडायची होती. त्यावेळी त्यांची ही भावना दिसली.' असा दावा एन्गिडीने केला आहे. काय घडले प्रकरण? दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग सुरू असताना 21 व्या ओव्हरचा अश्विनने टाकलेला चौथा बॉल एल्गारच्या पॅडला लागला, यानंतर भारताने अपील केलं आणि अंपायर मरेस इरासमस यांनी एल्गारला आऊट दिलं. एल्गारने मात्र डीआरएस (DRS Controversy) घेण्याचा निर्णय घेतला. एल्गारने डीआरएस घेतल्यानंतर मैदानातल्या मोठ्या स्क्रीनवर जे दिसलं ते पाहून फक्त टीम इंडियाच नाही तर अंपायरही धक्क्यात होते. पण विराट कोहलीने केलेलं वक्तव्य वादात सापडलं आहे. यामुळे त्याच्यावर आयसीसीकडून कारवाई होण्याचीही शक्यता आहे. IPL 2022 : लखनऊचे खास प्लॅनिंग, कमी किंमतीमध्ये घेणार वादळी खेळाडू एकीकडे विराटने हे वक्तव्य केलेलं असतानाच अंपायर मरेस इरासमस यांनीही डोकं हलवलं आणि हे अशक्य आहे, असं वक्तव्य केलं. तर अश्विनने प्रसारण करणाऱ्या सुपरस्पोर्ट चॅनलवरच निशाणा साधला. जिंकण्यासाठी चांगला मार्ग शोधा, सुपरस्पोर्ट असं अश्विन स्टम्प माईकच्या जवळ येऊन म्हणाला. तर संपूर्ण देशच आमच्याविरुद्ध खेळत आहे, असं वक्तव्य व्हाईस कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) याने केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: South africa, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या