मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : खणखणीत शतकानंतरही पंतने केली मोठी चूक, टीम इंडियाला पडणार महागात!

IND vs SA : खणखणीत शतकानंतरही पंतने केली मोठी चूक, टीम इंडियाला पडणार महागात!

Photo-BCCI

Photo-BCCI

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या (India vs South Africa 3rd Test) दुसऱ्या इनिंगमध्ये ऋषभ पंतने (Rishbah Pant) खणखणीत शतक केलं आहे. टेस्ट क्रिकेटमधलं पंतचं हे चौथं शतक आहे.

केपटाऊन, 13 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या (India vs South Africa 3rd Test) दुसऱ्या इनिंगमध्ये ऋषभ पंतने (Rishbah Pant) खणखणीत शतक केलं आहे. टेस्ट क्रिकेटमधलं पंतचं हे चौथं शतक आहे. ऋषभ पंतच्या नाबाद 100 रनच्या खेळीमुळे भारताचा 198 रनवर ऑल आऊट झाला, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 212 रनचं आव्हान मिळालं. पंतने 139 बॉलमध्ये नाबाद 100 रन केले, यात 6 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. ऋषभ पंतनंतर विराटच्या 29 रन भारताचा सर्वाधिक स्कोअर होता.

ऋषभ पंतने दुसऱ्या इनिंगमध्ये खणखणीत शतक केलं असलं तरी त्याने इनिंगच्या शेवटी मोठी चूक केली. 68 वी ओव्हर टाकण्यासाठी मार्को जेनसन बॉलिंगला आला तेव्हा बुमराह स्ट्राईकवर होता, यानंतर पहिल्या बॉलला त्याने एकही रन काढली नाही, तर पुढचा बॉल वाईड होता. यानंतर दुसऱ्या बॉलला बुमराहने मारलेल्या शॉटवर दोन रन काढण्यात आल्या, ज्यामुळे बुमराह पुन्हा स्ट्राईकवर आला. ओव्हरच्या तिसऱ्याच बॉलला जेनसनने बुमराहची विकेट घेतली. दुसऱ्या बॉलला जर पंतने एकाच रनवर बुमराहला रोखलं असतं तर पंत स्ट्राईकवर आला असता.

शार्दुल ठाकूरची विकेट गेल्यानंतर उमेश यादव आणि मोहम्मद शमी बॅटिंगला आले तेव्हा ऋषभ पंत या दोघांनाही फार स्ट्राईक देत नव्हता, मग अकराव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या बुमराहला पंतने ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलला स्ट्राईक देऊन चूक केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ऋषभ पंतचा विक्रम

ऋषभ पंतचं टेस्ट करियरमधलं हे चौथं शतक आहे. यातली तीन शतकं ही आशिया खंडाबाहेरची आहेत. आशिया खंडाबाहेर एवढी शतकं करणारा तो पहिलाच भारतीय विकेट कीपर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये शतक करण्याआधी पंतने 2018/19 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी टेस्टमध्ये नाबाद 159 रन केले होते. तर 2018 साली इंग्लंडविरुद्ध ओव्हल टेस्टमध्ये त्याने 114 रन केले होते. या तीन शतकांशिवाय पंतने 2021 साली अहमदाबादमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमध्येही शतक केलं होतं.

First published:

Tags: Rishabh pant, South africa, Team india