Home /News /sport /

IND vs SA : जोहान्सबर्ग टेस्टमध्ये अश्विननं घेतली स्पेशल विकेट, 16 वर्षांचा संपला दुष्काळ

IND vs SA : जोहान्सबर्ग टेस्टमध्ये अश्विननं घेतली स्पेशल विकेट, 16 वर्षांचा संपला दुष्काळ

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरी टेस्ट सध्या रंगतदार अवस्थेत आहे. या टेस्टमध्ये बुधवारी अश्विननं 16 वर्षांचा दुष्काळ संपवला.

    जोहान्सबर्ग, 6 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरी टेस्ट सध्या रंगतदार अवस्थेत आहे. या टेस्टचा तीन दिवसांचा खेळ संपला आहे. त्यानंतर टीम इंडिया विजयापासून 8 विकेट दूर आहे. तर दक्षिण आफ्रिकेला आणखी 122 रनची गरज आहे. बुधवारी खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या इनिंगमध्ये 2 आऊट 118 रन केले आहेत. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि आर. अश्विनला (R. Ashwin) प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे. अश्विनने कीगन पीटरसनला आऊट करत टीम इंडियाला दुसरं यश मिळाले. पीटरसनने 28 रन केले. अश्विननं ही विकेट घेताच नव्या इतिहासाची नोंद झाली. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विकेट घेणारा अश्विन हा दुसरा भारतीय स्पिनर आहे. यापूर्वी फक्त अनिल कुंबळे (Anil Kumble) या भारतीय स्पिनरनी वाँडरर्सवर टेस्टमध्ये विकेट घेतली आहे. अनिल कुंबळेनं 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये विकेट घेतली होती. त्यानंतर गेल्या 16 वर्षांमध्ये एकाही भारतीय स्पिनरला या पिचवर टेस्ट मॅचमध्ये विकेट मिळालेली नाही. अश्विननं हा दुष्काळ बुधवारी समाप्त केला. जोहान्सबर्गमध्ये स्पिनरनं शेवटची विकेट 2019 साली घेतली होती. शादाब खाननं ही कामगिरी केली. त्यानंतर या पिचवर एकूण 109 विकेट्स या फास्ट बॉलर्सनी घेतल्या आहेत. तर एक बॅटर रन आऊट झाला. त्यामुळे हे पिच स्पिन बॉलर्ससाठी किती आव्हानात्मक आहे, याचा अंदाज करता येईल. ICC Women World Cup 2022: टीम इंडियाची घोषणा, फॉर्मातील मुंबईकरला जागा नाही भारताला दक्षिण आफ्रिकेमध्ये अजून एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. याआधी सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने शानदार विजय मिळवला होता. आता या टेस्टमध्ये विजय मिळवून पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत सीरिज जिंकत इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियाला आहे. त्यासाठी अश्विननं अनुभवाचा वापर करत फास्ट बॉलर्सना साथ द्यावी अशी टीम मॅनेजमेंटला अपेक्षा आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, R ashwin, South africa, Team india

    पुढील बातम्या