मुंबई, 6 जानेवारी : न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022 (ICC Women World Cup 2022) स्पर्धेसाठी टीम इंडियाची (Team India Women) घोषणा झाली आहे. मिताली राज (Mithali Raj) 15 सदस्यीय टीमची कॅप्टन असेल. तर हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) व्हाईस कॅप्टन करण्यात आले आहे. भारतीय टीममध्ये जेमिमा रॉड्रिग्स, शिखा पांडे, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती आणि हरलीन देओल यांना जागा मिळालेली नाही. यापैकी जेमिमाला वगळण्याचा निर्णय सर्वात धक्कादायक मानला जात आहे. मुंबईकर जेमिमा सध्या जोरदार फॉर्मात आहे. इंग्लंडमधील द हंड्रेड आणि ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत तिने दमदार कामगिरी केली होती.
#TeamIndia squad for ICC Women's World Cup 2022 & New Zealand ODIs:
— BCCI Women (@BCCIWomen) January 6, 2022
Mithali Raj (C), Harmanpreet Kaur (VC), Smriti, Shafali, Yastika, Deepti, Richa Ghosh (WK), Sneh Rana, Jhulan, Pooja, Meghna Singh, Renuka Singh Thakur, Taniya (WK), Rajeshwari, Poonam. #CWC22 #NZvIND pic.twitter.com/UvvDuAp4Jg
महिला वर्ल्ड कपमधील भारताची पहिली मॅच 6 मार्च रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण 8 टीम सहभागी होणार असून सर्व टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत. या स्पर्धेची फायनल 3 एप्रिल रोजी होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्यापूर्वी टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 5 वन-डे सामने खेळणार आहे. 11 ते 24 फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंडमध्येच ही मालिका होईल. वर्ल्ड कप आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी महिला टीम : मिताली राज (कॅप्टन), हरमनप्रीत कौर (व्हाईस कॅप्टन), स्मृती मंधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघना सिंह, रेणूका सिंह ठाकूर, तानिया भाटिया (विकेटकीपर), राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव. राखीव खेळाडू : सब्बीनेनी मेघना, एकता बिष्ट आणि सिमरन दिल बहादूर