जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : टीम इंडियात होणार 2 बदल! वाचा कुणाला मिळणार तिकीट, कुणाचा पत्ता कट

IND vs SA : टीम इंडियात होणार 2 बदल! वाचा कुणाला मिळणार तिकीट, कुणाचा पत्ता कट

IND vs SA : टीम इंडियात होणार 2 बदल! वाचा कुणाला मिळणार तिकीट, कुणाचा पत्ता कट

या मालिकेतील (India vs South Africa) दुसरी टी20 रविवारी कटकमध्ये होणार आहे. बरोबरी साधण्यासाठी भारतीय टीम या सामन्यात दोन बदल करू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जून : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या टी20 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. या टी20 मध्ये 211 रनचं संरक्षण कऱण्यात टीम इंडियाला अपयश आलं होतं. या पराभवानंतर भारतीय टीम पाच सामन्यांच्या मालिकेत 0-1 अशी पिछाडीवर पडली आहे. या मालिकेतील दुसरी टी20 रविवारी कटकमध्ये होणार आहे.  बरोबरी साधण्यासाठी भारतीय टीम या सामन्यात दोन बदल करू शकते. दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या टी20 मध्ये आवेश खानचा अपवाद वगळता अन्य सर्व भारतीय बॉलर्सची चांगलीच धुलाई झाली. त्यांनी 10 पेक्षा जास्त इकोनॉमी रेटनं रन दिले. टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या युजवेंद्र चहलनं 12 च्या इकोनॉमी रेटनं 2.1 ओव्हरमध्ये 26 रन दिले. हार्दिक पटेलच्या 1 ओव्हरमध्ये 18 रन निघाले. त्यानंतर त्याला पुन्हा बॉलिंग देण्याची कॅप्टन ऋषभ पंतची हिंमत झाली नाही. डेथ ओव्हरमध्ये नेहमी चांगली बॉलिंग करणाऱ्या हर्षल पटेलचीही खराब अवस्था झाली होती. दक्षिण आफ्रिकेच्या इनिंगमधील 17 व्या ओव्हरमध्ये त्यानं 22 रन दिले. अनुभवी भुवनेश्वर कुमारचीही वेगळी परिस्थिती नव्हती. तो देखील डेथ ओव्हर्समध्ये महाग ठरला. या सर्व पार्श्वभूमीवर टीम इंडियामध्ये काय बदल होणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. IND vs ENG : अश्विननं सुरू केली इंग्लंड दौऱ्याची तयारी, सेमी फायनलमध्ये दमदार खेळी भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल या दोन अनुभवी बॉलर्सची प्लेईंग 11 मधील जागा नक्की आहे. आवेश खाननं दिल्लीमध्ये चांगली बॉलिंग केली होती. त्यामुळे तो देखील कटकमध्ये खेळणार हे स्पष्ट आहे. त्या परिस्थितीमध्ये दुसऱ्या टी20 मध्ये हर्षल पटेलला बाहेर बसावं लागू शकतं. हर्षलच्या जागेवर उमरान मलिक किंवा अर्शदीप सिंग यांना संधी देण्याचा विचार टीम मॅनेजमेंट करू शकते.  त्याचबरोबर स्पिन बॉलिंगमध्येही एक बदल होऊ शकतो. पहिल्या सामन्यात अक्षर पटेलनं खराब बॉलिंग केली होती. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 40 रन दिले. अक्षरच्या जागी रवी बिश्नोईला खेळवण्याचा पर्याय टीम मॅनेजमेंटकडे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात