मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : अश्विननं सुरू केली इंग्लंड दौऱ्याची तयारी, सेमी फायनलमध्ये दमदार खेळी

IND vs ENG : अश्विननं सुरू केली इंग्लंड दौऱ्याची तयारी, सेमी फायनलमध्ये दमदार खेळी

भारताचा अनुभवी स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील 5 वी टेस्ट 1 जुलैपासून होणार आहे.

भारताचा अनुभवी स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील 5 वी टेस्ट 1 जुलैपासून होणार आहे.

भारताचा अनुभवी स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील 5 वी टेस्ट 1 जुलैपासून होणार आहे.

मुंबई, 11 जून : भारताचा अनुभवी स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील 5 वी टेस्ट 1 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय टीम 15 जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. अश्विननं इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या फर्स्ट क्लास स्पर्धेत खेळत आहे.

अश्विननं या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये एमआरसी ए या क्लबकडून मैदानात उतरला. त्यानं या सामन्यात 81 रनची खेळी केली. अश्विनच्या या खेळीच्या मदतीनं त्याची टीम आता फायनलमध्ये पोहचली आहे.  अश्विननं या मॅचबद्दल बोलताना सांगितलं की, 'टी20 क्रिकेटमधून रेड बॉल क्रिकेटमध्ये शिफ्ट होण्यासाठी मी ही स्पर्धा खेळत आहे. मी माझ्या खेळाचा आनंद घेतोय आणि इंग्लंडमध्येही तेच करण्याची इच्छा आहे. मी बॅट आणि बॉल या दोन्हीच्या माध्यमातून योगदान देऊ शकतो. त्याचबरोबर मला माझा फिटनेस देखील चांगला ठेवायचा आहे.'

टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून अनिल कुंबळेनंतर (619) सर्वाधिक विकेट्स अश्विनच्या नावावर (442) आहेत. श्रीलंका विरूद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये त्यानं कपिल देव (434) यांना मागे टाकलं. अश्विन या विषयावर बोलताना म्हणाला की, 'मी माझ्या खेळावर खूप कष्ट केले आहेत. मी बराच विचार करतो. मी माझ्या खेळावर खूश आहे तसंच फार पूढचं लक्ष्य ठेवलेलं नाही.' आयपीएल स्पर्धेत अश्विन राजस्थान रॉयल्सकडून खेळला. या स्पर्धेच्या दरम्यान राजस्थानचा कोच कुमार संगकारानं अश्विनच्या बॉलिंगवर मोठं वक्तव्य केलं होतं. ' अश्विन ऑफ स्पिनपेक्षा दुसरा बॉल अधिक टाकतो. त्याला यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे,' असा सल्ला संगकारानं दिला होता.

PAK vs WI: बाबर आझमची चालाखी उघड, अंपायरनं दिली संपूर्ण टीमला शिक्षा

35 वर्षांच्या अश्विनचा टेस्ट रेकॉर्ड जबरदस्त आहे.त्यानं 86 टेस्टमध्ये 24 च्या सरासरीनं 442 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 5 शतक आणि 12 अर्धशतक झळकावली आहेत.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england, R ashwin