Home /News /sport /

IND vs NZ: विराट कोहलीचं दमदार कमबॅक, सर्वात मोठ्या रेकॉर्ड्सह दिलं टीकाकारांना उत्तर

IND vs NZ: विराट कोहलीचं दमदार कमबॅक, सर्वात मोठ्या रेकॉर्ड्सह दिलं टीकाकारांना उत्तर

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीवर जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई टेस्ट दणदणीत जिंकत विराटनं सर्वात मोठ्या रेकॉर्ड्सह टीकाकारांना उत्तर दिले आहे.

    मुंबई, 6 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीवर जोरदार चर्चा सुरू आहे. विराटनं टी20 टीमची कॅप्टनसी सोडली आहे. वन-डे टीमची त्याची कॅप्टनसी धोक्यात आली आहे . निवड समिती लवकरच याबाबत निर्णय घेणार आहे. विराटनं कानपूर टेस्टमध्ये विश्रांती घेतली होती. ती टेस्ट ड्रॉ झाली. मुंबई टेस्टमध्ये त्यानं प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही न्यूझीलंडचा मोठा पराभव केला. या विजयासह कॅप्टन म्हणून त्याची क्षमता विराटनं पुन्हा एकदा केली आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वातील सर्वात मोठ्या रेकॉर्डची नोंद केली आहे. टेस्ट, वन-डे आणि टी20 या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तीन्ही प्रकारात 50 मॅच जिंकणारा विराट हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियानं विजय मिळवताच त्याने हा रेकॉर्ड केला. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) किंवा ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉन्टींग (Ricky Ponting) यांच्यासह क्रिकेट इतिहासातील कुणालाही आजवर ही कामगिरी करता आलेली नाही. रिकी पॉन्टिंगनं खेळाडू म्हणून सर्वात जास्त 108 टेस्ट जिंकल्या आहेत. वन-डेमध्ये तर त्याच्या नावावर 262 मॅच जिंकण्याचा रेकॉर्ड आहे. पण  टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पॉन्टिंगनं खेळाडू म्हणून फक्त 7 मॅच जिंकल्या आहेत. विराटनं 50 टेस्ट, 153 वन-डे आणि 59 टी20 मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे त्याला तीन्ही प्रकाराचा किंग असं म्हणता येईल. IND vs NZ: अश्निनच्या जाळ्यात अडकले वर्ल्ड चॅम्पियन, दिग्गज खेळाडूचं त्रिशतक पूर्ण सचिनचा रेकॉर्ड काय? मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा सर्वात जास्त टेस्ट जिंकणारा भारतीय खेळाडू आहे. सचिननं 72 टेस्टमध्ये विजय मिळवला आहेत. त्यानं 234 वन-डे जिंकल्यात. तर फक्त 1 टी20 इंटरनॅशनल जिंकली आहे. धोनीनं 205 वन-डे आणि 57 टी20 मॅच खेळाडू म्हणून जिंकल्या आहेत. पण टेस्ट क्रिकेटमध्ये 50 मॅच जिंकण्यात त्याला अपयश आले. धोनीच्या नावावर 36 टेस्ट मॅच विजयाची नोंद आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या