मुंबई, 6 डिसेंबर : टीम इंडियानं मुंबई टेस्टमध्ये न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 372 रननं मोठा पराभव केला. या विजयाबरोबरच भारतीय टीमने 2 टेस्ट मॅचची सीरिज 1-0 ने जिंकली आहे. या सीरिजमधील कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. त्यामुळे मुंबई टेस्टला ‘करो वा मरो’ चे महत्त्व प्राप्त झाले होते. भारतीय टीमनं या निर्णायक टेस्टमध्ये न्यूझीलंडला कोणताीही संधी न देता मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले. टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) मालिका विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानं या सीरिजमध्ये 14 विकेट्स घेतल्या. या कामगिरीबद्दल अश्विनला ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आले. अश्विनने मुंबई टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. या 8 विकेट्सबरोबरच त्यानं अनेक विक्रम पूर्ण केले आहेत. अश्विनने सोमवारी हेन्री निकोल्सला आऊट करत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विकेट्ससह भारतीय पिचवर 300 विकेट्स घेण्याची कामगिरी देखील अश्विननं पूर्ण केली आहे. होम ग्राऊंडवर 300 टेस्ट विकेट्स घेणारा अश्विन क्रिकेट विश्वातील सहावा तर टीम इंडियाचा दुसरा बॉलर आहे. अश्विनपूर्वी अनिल कुंबळे (Anil Kumble) याने ही कामगिरी केली आहे. कुंबळेच्या नावावर भारतामधील 63 टेस्टमध्ये 350 विकेट्स आहेत. अश्विननं यापूर्वी रविवारी एकाच कॅलेंडर वर्षात 50 विकेट्स घेण्याची कामगिरी चौथ्यांदा पूर्ण केली. त्यापूर्वी त्यानं 2015, 2016 आणि 2017 साली ही कामगिरी केली होती. चार कॅलेंडर वर्षात 50 किंवा त्याहून जास्त विकेट्स घेणारा अश्विन हा पहिला भारतीय बॉलर आहे. अनिल कुंबळे यांनी ही कामगिरी 3 वेळा केली आहे. तर हरभजन सिंग आणि कपिल देव यांनी हा विक्रम प्रत्येकी 2 वेळा नोंदवला आहे. IND vs NZ: टीम इंडियानं घेतला न्यूझीलंडचा बदला, ICC टेस्ट रँकिंगमध्ये मारली मोठी उडी अश्विन आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर ठरला आहे. त्याने मुंबई टेस्टमध्ये 8 विकेट्स घेत न्यूझीलंडचा महान बॉलर सर रिचर्ड हॅडलीला मागे टाकले. हॅडलीच्या नावावर 65 विकेट्स आहेत. अश्विनच्या नावावर आता 81 टेस्टमध्ये 427 विकेट्स आहेत. अश्विननं या सीरिजमध्ये हरभजन सिंगला (417 विकेट्स) मागे टाकले कपिल देव यांना मागे टाकण्यासाठी (434 विकेट्स) त्याला आणखी 8 विकेट्सची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.