मुंबई, 6 डिसेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी टेस्ट ही खराब अंपायरिंगमुळे गाजत आहे. टीम इंडियाच्या पहिल्या इनिंगमध्ये विराट कोहलीला (Virat Kohli) आऊट देण्याचा थर्ड अंपायरचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. त्या निर्णयावर क्रिकेट विश्वातून भरपूर टीका झाली. रविवारी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी देखील खराब अंपायरिंगचा प्रकार मैदानात घडला. त्यावेळी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) राग आवरता आला नाही. काय घडला प्रकार? सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. यामध्ये विराट अंपायरला उद्देशून ‘ही लोकं काय करत आहेत यार. मी तिकडे जातो, तुम्ही इकडं या.’ असं म्हणत आहेत. न्यूझीलंडच्या दुसऱ्या इनिंगमधील 16 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. अक्षर पटेलनं (Axar Patel) टाकलेला तो बॉल रॉल टेलर आणि विकेट किपर ऋद्धीमान साहा या दोघांना चकवत बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेला. पण अंपायरनं चार रन बाय म्हणून दिले नाहीत. तर टेलरच्या खात्यात टाकली.तो बॉलर टेलरच्या बॅटला लागून गेल्याची समजूत अंपायरची झाली. विराट कोहली अंपायरच्या या निर्णयावर नाराज झाला.
"Ye kya karte hain yaar ye log yaar"
— Kohli's lovebot 💌 (@Kohlian_luvlush) December 5, 2021
"Main udhar aajata hu tum idhar aajao"
VIRAT KOHLI ISSA MOOD🤣😭#INDvsNZ pic.twitter.com/048dtpbyPg
विराटच्या विकेटचा वाद मुंबई टेस्टच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीला वादग्रस्त पद्धतीने आऊट देण्यात आले होते. एजाझ पटेलने विराटला एलबीडब्ल्यू केलं. मैदानातले अंपायर नितीन मेनन (Umpire Nitin Menon) यांनी विराटला आऊट दिलं, यानंतर विराटने एकही क्षण न घालवता डीआरएस घेतला. बॉल बॅटला लागल्याचा विश्वास विराटला होता. थर्ड अंपायरनेही अनेकवेळा रिप्ले बघितले, पण तरीही थर्ड अंपायरला योग्य निर्णयापर्यंत पोहोचता आलं नाही, अखेर त्याने मैदानातल्या अंपायरने दिलेल्या निर्णयासोबत जायचं ठरवलं, ज्यामुळे विराटला माघारी परतावं लागलं. विराट कोहलीची कॅप्टनसी धोक्यात! टीम इंडियातील 2 दिग्गजांची जागाही अडचणीत रिप्ले बघितल्यानंतर बॉल बॅट आणि पॅडला एकाच वेळी लागल्याचं वाटत होतं. बॉल जर पहिले पॅडला लागला असता तर विराट एलबीडब्ल्यू असता, पण जर बॉल आधी बॅटला आणि मग पॅडला लागला असता तर त्याला नॉट आऊट देण्यात आलं असतं. रिप्लेमध्ये बॉल बॅटला पहिले लागला का पॅडला हे स्पष्ट दिसत नव्हतं, त्यामुळे चाहते अंपायर नितीन मेनन आणि थर्ड अंपायरच्या निर्णयावरून अजिबात खुश नव्हते. विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये जाताना या निर्णयावरून संतापला. बाऊंड्री लाईनवर विराटने जोरात बॅट आपटली.