मुंबई, 14 नोव्हेंबर: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) आता भारतीय क्रिकेट टीमचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. द्रविड पूर्णवेळ प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय टीम न्यूझीलंड विरुद्ध 3 टी20 आणि 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. द्रविडनं यापूर्वी टीम इंडियाच्या तरुण खेळाडूंना घडवण्याचं काम केलं आहेत. तो भाारत-ए टीमचा कोच आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) संचालक देखील होता. 500 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मॅचचा अनुभव असलेल्या द्रविडकडं मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याच्या मार्गदर्शनात टीम इंडिया कशी कामगिरी करते याची सर्वांनाच उत्सुकता आहे. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होताच लगेच कामाला लागला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार द्रविडनं सर्व खेळाडूंशी वन-टू-वन संवाद साधला असून त्यांची मनस्थिती समजून घेतली. आगामी सीरिजमध्ये त्यांना संधी देण्यात येईल, असा धीर द्रविडनं त्यांना दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार द्रविडनं प्रत्येक खेळाडूशी वेगवेगळा संवाद साधला. त्यांना मानसिक आणि शारीरिक स्थिती समजावून घेतली. फिट नसाल तर आराम करा असा सल्ला दिला. तसंच सर्वांना संधी मिळेल असं आश्वासन दिलं. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट टीमला प्रत्येक खेळाडूकडून काय अपेक्षा आहे, याची देखील त्यांना थोडक्यात कल्पना दिली. द्रविडनं त्याच्या करिअरमध्ये 164 टेस्ट, 344 वन-डे आणि 1 टी20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं टेस्टमध्ये 36 शतक आणि 63 अर्धशतकांसह 13288 रन काढले आहेत. तर वन-डेमध्ये 12 शतक आणि 83 अर्धशतकांसह एकूण 10889 रन काढले आहेत. त्याच बरोबर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 23794 रन आहेत. टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरवर युवराजचा निशाणा, विराट-अनुष्काचं Meme Share करत लगावला टोला न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा( कॅप्टन), केएल राहुल (व्हाईस कॅप्टन), ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, सूर्य़कुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.