जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: मॅच दरम्यान काय लपवत होता ऋषभ पंत? अखेर सत्य आलं समोर

IND vs NZ: मॅच दरम्यान काय लपवत होता ऋषभ पंत? अखेर सत्य आलं समोर

IND vs NZ: मॅच दरम्यान काय लपवत होता ऋषभ पंत? अखेर सत्य आलं समोर

ऋषभ पंतनं (Rishabh Pant) जिमी नीशनच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स लगावत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऋषभ पंतच्या या सिक्सपेक्षा त्यानं घातलेल्या जर्सीवर काय लपवलं आहे? याची चर्चा जास्त झाली

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 नोव्हेंबर: टीम इंडियानं दुसऱ्या टी20 मॅचमध्ये न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 7 विकेट्सनं पराभव करत तीन सामन्यांची मालिका जिंकली आहे. या मॅचमध्ये न्यूझीलंडनं 154 रनचं लक्ष्य दिलं होते. जे भारतीय क्रिकेट टीमनं 16 बॉल राखत 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. केएल राहुलनं (KL Rahul) 65 तर रोहित शर्मानं (Rohit Sharma) 55 रन काढले. ऋषभ पंतनं (Rishabh Pant) जिमी नीशनच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स लगावत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऋषभ पंतच्या या सिक्सपेक्षा त्यानं घातलेल्या जर्सीवर काय लपवलं आहे? याची चर्चा जास्त झाली. रांचीमधील मॅचमध्ये ऋषभनं घातलेल्या जर्सीवर टीम इंडियानं उजव्या भागात मोठी टेप लावली होती. अनेक फॅन्सना ऋषभ पंतनं जर्सीवर टेप का लावली आहे, हे समजलं नाही. अखेर, याचं सत्य समोर आलं आहे. पंतनं टी20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेतील जर्ली घातली होती. या जर्सीवर टी20 वर्ल्ड कप 2021 चा लोगो होता. तो लोगो पंतनं दुसऱ्या टी20 मॅचच्या दरम्यान टेपनं लपवला होता.

News18

द्विपक्षीय सीरिजमध्ये आयसीसीचा लोगो वापरण्यास परवानगी नसते. अन्य भारतीय खेळाडूंनी या सीरिजसाठी असलेली जर्सी घातली होती. त्याचवेळी पंत वेगळ्या जर्सीमध्ये होता. टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचं आव्हान सुपर 12 मध्येच संपुष्टात आले. त्यानंतर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला 8 विकेट्सनं हरवत हा वर्ल्ड कप जिंकला. IND vs ENG: रोहित शर्माच्या आवडत्या मैदानात होणार शेवटची मॅच, टीम इंडियाची ‘क्लीन स्वीप’वर नजर टी20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं 8 विकेट्सनं पराभव केल्यानं टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करता आला नव्हता. भारतीय टीमनं या पराभवाचा बदला घेतला आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने टीम इंडियानं एकतर्फी जिंकले आहेत. बुधवारी जयपूरमध्ये 5 विकेट्सनं विजय मिळवल्यानंतर टीम इंडियानं रांचीमधील मॅचही 7 विकेट्सनं जिंकली आहे. आता या सीरिजमधील तिसरी आणि शेवटची मॅच रविवारी रांचीमध्ये होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात