Home /News /sport /

IND vs ENG: राहुलमुळे झाली टीम इंडिया मजबूत, पण जिवलग मित्राच्या करिअरला लागला ब्रेक

IND vs ENG: राहुलमुळे झाली टीम इंडिया मजबूत, पण जिवलग मित्राच्या करिअरला लागला ब्रेक

टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन केएल राहुलनं (KL Rahul) या टेस्ट सीरिजमध्ये (India vs England Test Series 2021) जोरदार खेळ केला आहे. राहुलनं आत्तापर्यंत एक शतक आणि एक अर्धशतकाच्या जोरावर 244 रन काढले आहेत.

    मुंबई, 21 ऑगस्ट: टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन केएल राहुलनं (KL Rahul) या टेस्ट सीरिजमध्ये (India vs England Test Series 2021) जोरदार खेळ केला आहे. राहुलनं आत्तापर्यंत एक शतक आणि एक अर्धशतकाच्या जोरावर 244 रन काढले आहेत. लॉर्ड्स टेस्टमधील विजयात राहुलच्या शतकाचे मोठे योगदान होते. आता या सीरिजमधील तिसरी टेस्ट 25ऑगस्टपासून हेडिंग्लेमध्ये होणार आहे. केएल राहुल या सीरिजमध्ये टीम इंडियाकडून (Team India) सर्वात जास्त रन करणारा बॅट्समन आहे. या सीरिजमध्ये त्याला संधी मिळेल याचा कुणी विचारही केला नव्हता. युवा ओपनर शुभमन गिल  (Shubman Gill) दुखापतीमुळे टेस्ट सीरिजमधून आऊट झाला. त्याच्या जागेवर मयंक अग्रवाल  (Mayank Agarwal) खेळणार हे निश्चित होते. पण, पहिल्या टेस्टच्यापूर्वी प्रॅक्टीसच्या दरम्यान मयंक जखमी झाला. त्यामुळे राहुलनं 2 वर्षांनंतर टीममध्ये पुनरागमन केलं. आता राहुलच्या खेळामुळे त्याचा जिवलग मित्र मयंक अग्रवालला या सीरिजमध्ये संधी मिळण्याची शक्यता समाप्त झाली आहे. राहुल या सीरिजमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) 386 रनसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर राहुलनं 4 इनिंगमध्ये 61 च्या सरासरीनं 244 रन काढले आहेत. तसेच तो एकूण 562 बॉल खेळला आहे. अन्य कोणत्याही बॅट्समननं अद्याप 200 पेक्षा जास्त रन केलेले नाहीत. टीम इंडियाचा दुसरा ओपनर रोहित शर्मानं (Rohit Sharma) एका अर्धशतकासह 152 रन काढले आहेत. Live मॅचमध्ये राशिद खानचं दिसलं अफगाणिस्तानबद्दल प्रेम, Photo पाहून कराल सलाम 75 वर्षांनंतर बेस्ट पार्टनरशिप केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी 4 इनिंगमध्ये 69 च्या सरासरीनं 275 रन केले आहेत. त्यांनी एक शतकी आणि एक अर्धशतकी पार्टनरशिप केली आहे. ही गेल्या 75 वर्षांमधील सर्वोत्तम सरासरी आहे. यापूर्वी 1936 सीरिजमध्ये ओपनिंग जोडीनं 71 च्या सरासरीनं रन केले आहेत. या सीरिजमधील आणखी तीन टेस्ट बाकी आहेत. त्यामुळे आणखी अनेक रेकॉर्ड करण्याची संधी राहुल-रोहित जोडीला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Kl rahul

    पुढील बातम्या