मुंबई, 24 जुलै : भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) टोकयो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं आहे. मीराबाईनं 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत हे मेडल जिंकले. मीराबाईनं स्नॅच गटात 87 आणि क्लीन अँड जर्क गटात 115 किलो वजन उचललं. ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी Mirabai Chanu wins Silver Medal) ती पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. (फोटो – AP)
मीराबाईचा ऑलिम्पिक मेडलपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिने यासाठी वयाच्या 12 व्या वर्षीच ट्रेनिंग सुरू केले. तिला सुरुवातीला तिरंदाज व्हायचं होतं. मात्र एक व्हिडीओ पाहिल्यानंतर तिचं आयुष्य बदललं आणि तिनं वेटलिफ्टर होण्याचा निश्चय केला. (फोटो – AP)
दिग्गज वेटलिफ्टर कुंजराणी देवीची व्हिडीओ क्लिप पाहून मीराबाईनं वेटलिफ्टर होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने 2006 पासूनच प्रशिक्षण घेण्यास सुरू केले. (फोटो – AP)
मीराबाईचं घर ते कोचिंग सेंटर यामध्ये 20 किलोमीटर अंतर होते. ती ट्रकमध्ये लिफ्ट घेऊन किंवा सायकलवर तिथे जात असे. वादळ, पाऊस यासारखा कोणताही अडथळा आला तरी तिनं कधीही ट्रेनिंग चुकवली नाही.
मीराबाईच्या या प्रवासात अनेक अडचणी आल्या. तिचे वडील सैखोन कृती सिंह सरकारी कर्मचारी होते. पण, त्यांचा पगार खूप कमी होता. त्या पगारात 6 मुलांचे पालन-पोषण करणे सोपे नव्हते. मुलीची गुणवत्ता पाहून त्यांनी तिच्या ट्रेनिंगमध्ये काहीही कमी पडू दिले नाही.
मीराबाईनं 2014 मध्ये ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेजल जिंकलं होतं. 2017 मध्ये वर्ल्ड चँपियनशिप आणि साल 2018 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिनं गोल्ड मेडल जिंकलं. आणि आता पुन्हा एकदा तिने भारताचं नाव अभिमानाने उंचावलं आहे.