चेन्नई, 15 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सुरू असलेल्या चेन्नई टेस्टमध्ये स्पिन बॉलर्सचा दबदबा कायम आहे. चेन्नईच्या पिचनं पहिल्या दिवसापासून स्पिनर्सला मदत केली आहे. दुसऱ्या दिवशी तर या पिचवर भारताच्या पाच आणि इंग्लंडच्या 10 अशा एकूण 15 विकेट्स गेल्या.
चेन्नईच्या पिचवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी आक्षेप नोंदवला आहे. त्या आक्षेप घेणाऱ्या मंडळींना भारताचे महान खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी चोख उत्तर दिलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी ‘स्टार स्पोर्ट्स’ वरील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
काय म्हणाले गावसकर ?
“रोहित शर्मानं दीडशतक झळकावल्याचं आपण पहिल्या दिवशी पाहिलं आहे. या पिचवरही बॅटिंग करता येते हे रोहित शर्मानं दाखवून दिलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये स्विंग बॉलिंगला मदत करणारे पिच बनवण्यात येते. तेथील पिचवर पहिल्या दिवसापासून बॉल स्विंग व्हायला लागतो. तेव्हा कुणीही बोलत नाही. हा प्रश्न नेहमी भारतीय पिचवर बॉल फिरायला लागला की विचारला जातो.’’ असं गावसकर यांनी स्पष्ट केलं.
( वाचा : IND vs ENG : पुजारा विचित्र पद्धतीनं आऊट, टीम इंडियाची टॉप ऑर्डर गडगडली! )
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉ याने देखील चेन्नईच्या पिचवर टीका केली होती. गावसकर यांनी त्याचाही समाचार घेतला. “काही जणांना (ऑस्ट्रेलियन खेळाडू) भारत आवडत नाही. इंग्लंडही आवडत नाही. त्यामुळे ते कायम भारत आणि इंग्लंडच्या विरुद्ध बोलत असतात. या प्रकारच्या दुटप्पी लोकांकडं दुर्लक्ष केलं पाहिजे. आपण रोहित शर्माची खेळी पाहिली आहे. पिच खेळण्यासाठी खरंच अवघड असतं तर कोणत्याही टीमनं 330 रन केले नसते.’’
“ हे खेळण्यासाठी अयोग्य नाही, आव्हानात्मक आहे. क्रिकेट हे असंच असायला हवं. पहिल्या टेस्टमधील पहिले दोन दिवस काहीही घडले नाही. त्यावेळी सर्वांनी हा कंटाळवाणा प्रकार आहे. बॅटिंगला मदत करणारं पिच आहे, अशी टीका केली होती. तुम्ही यामध्ये संतुलन साधलं पाहिजे. तुम्ही सतत टीका करणे योग्य नाही,’’ असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.