ऋषभ पंतनं या टेस्टमध्ये विकेट किपिंगसह बॅटिंगमध्येही चांगला खेळ केला आहे. त्यानं पहिल्या डावात 77 बॉलमध्ये सात फोर आणि तीन सिक्सच्या मदतीनं नाबाद 58 रन काढले. हे पंतच सलग चौथ्या टेस्टमधील अर्धशतक आहे. चेन्नई टेस्टच्या पहिल्या डावातही त्यानं 88 बॉलमध्ये 91 रन काढले होते. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी टेस्टमध्ये 97 तर ब्रिस्बेन टेस्टमध्ये नाबाद 89 रनची खेळी पंतनं केली होती. ( वाचा : IPL Auction पूर्वी अर्जुन तेंडुलकरचा धमाका, फक्त 31 बॉलमध्ये ठोकले 77 रन! ) त्याचबरोबर त्यानं दुसऱ्या टेस्टमध्ये विकेट किपिंगमध्येही कमाल केली. त्यानं ओली पोप आणि जॅक लीचचा छान कॅच घेतला. पंतला दुसऱ्या डावात मात्र कमाल करता आली नाही. तो फक्त 8 रन काढून आऊट झाला.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, IPL 2021, Rishabh pant, Rohit sharma, Sports, Virender sehwag