मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction पूर्वी अर्जुन तेंडुलकरचा धमाका, फक्त 31 बॉलमध्ये ठोकले 77 रन!

IPL Auction पूर्वी अर्जुन तेंडुलकरचा धमाका, फक्त 31 बॉलमध्ये ठोकले 77 रन!

अर्जुन तेंडुलकरनं (Arjun Tendulkar)  जबरदस्त 'ऑल राऊंड' कामगिरी केली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनसाठी याच आठवड्यात 18 फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2021) होणार आहे.

अर्जुन तेंडुलकरनं (Arjun Tendulkar) जबरदस्त 'ऑल राऊंड' कामगिरी केली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनसाठी याच आठवड्यात 18 फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2021) होणार आहे.

अर्जुन तेंडुलकरनं (Arjun Tendulkar) जबरदस्त 'ऑल राऊंड' कामगिरी केली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनसाठी याच आठवड्यात 18 फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2021) होणार आहे.

मुंबई, 15 फेब्रुवारी : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं (Arjun Tendulkar)  जबरदस्त 'ऑल राऊंड' कामगिरी केली आहे. अर्जुननं 73 व्या पोलीस निमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत (Police Invitation Shield Cricket Tournament 2020-2021) फक्त 31 बॉलमध्ये नाबाद  77 रनची आक्रमक खेळी केली. त्यानंतर 41 रन देऊन तीन विकेट्सही घेतल्या. अर्जुनच्या या कामगिरीच्या जोरावर एनआयजी क्रिकेट क्लबनं (MIG Cricket Club) इस्लाम जिमखान्याचा 194 रननं दणदणीत पराभव केला. आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनसाठी याच आठवड्यात 18 फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2021) होणार आहे. या लिलावात यंदा अर्जुन पहिल्यांदाच सहभागी होत आहे. त्यामुळे त्याच्या खेळीचं विशेष महत्त्व आहे.

कोरोना व्हायरस लॉकडाऊननंतर मुंबईमध्ये होणारी ही पहिलीच क्रिकेट स्पर्धा आहे. रविवारी या स्पर्धेतील दुसरी मॅच होती. 21 वर्षाच्या अर्जुननं त्याच्या खेळात पाच फोर आणि आठ सिक्स ठोकले. त्यानं ऑफ स्पिनर हाशिर दाफेदारच्या एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स लगावले. अर्जुनसह केविन डीएलमेडा (96) आणि प्रज्ञेश खांडिलेवार (112) यांनीही चांगला खेळ करत एमआयजीच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.

( वाचा : IPL 2021 : अर्जुन तेंडुलकरच नाही, या दिग्गज क्रिकेटपटूंची मुलंही खेळली आयपीएल )

IPL Auction पूर्वी अर्जुन फॉर्मात

एमआयजी क्लबनं पहिल्यांदा बॅटींग करताना 45 ओव्हरमध्ये सात आऊट 385 असा विशाल स्कोअर केला. याला उत्तर देताना इस्लाम जिमखान्याची टीम 41.5 ओव्हरमध्ये 191 रनवरच ‘ऑल आऊट’ झाली. एमआयजीकडून अर्जुनसह अंकुश जयस्वाल आणि श्रेयस गुरव यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

अर्जुननं नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईच्या सिनियर टीममधून पदार्पण केलं होतं. 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आयपीएल लिलावातील खेळाडूंच्या यादीतही त्याच्या नावाचा समावेश आहे. अर्जुनचं हे प्रदर्शन पाहून आयपीएल फ्रँचायझी त्याच्यावर बोली लावण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Arjun Tendulkar, Cricket, IPL 2021, Ipl 2021 auction, Sports