मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : लॉर्ड्समधील शतकानंतर राहुलला मिळाली राजेशाही वागणूक, पाहा VIDEO

IND vs ENG : लॉर्ड्समधील शतकानंतर राहुलला मिळाली राजेशाही वागणूक, पाहा VIDEO

लॉर्ड्सच्या मैदानाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता या मैदानावर शतक झळकावण्याची प्रत्येक बॅट्समनची इच्छा असते. केएल राहुल (KL Rahul) लॉर्ड्सवर शतक झळकावणारा दहावा भारतीय आहे.

लॉर्ड्सच्या मैदानाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता या मैदानावर शतक झळकावण्याची प्रत्येक बॅट्समनची इच्छा असते. केएल राहुल (KL Rahul) लॉर्ड्सवर शतक झळकावणारा दहावा भारतीय आहे.

लॉर्ड्सच्या मैदानाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता या मैदानावर शतक झळकावण्याची प्रत्येक बॅट्समनची इच्छा असते. केएल राहुल (KL Rahul) लॉर्ड्सवर शतक झळकावणारा दहावा भारतीय आहे.

लॉर्ड्स, 13 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व होते. केएल राहुलच्या (KL Rahul) शतकाच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 3 आऊट 276 रन काढले. राहुल पहिल्या दिवसाच्या अखेरीस 127 रनवर नाबाद आहे. राहुलनं 248 बॉलमध्ये 12 फोर आणि 1 सिक्स लगावत दिवसभर किल्ला लढवला. लॉर्ड्स टेस्टचा पहिला दिवस गाजवणाऱ्या राहुलचं ड्रेसिंग रुममध्ये परतल्यावर कसं स्वागत झालं याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

लॉर्ड्सच्या मैदानाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता या मैदानावर शतक झळकावण्याची प्रत्येक बॅट्समनची इच्छा असते. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर या दिग्गजांना लॉर्ड्सवर आजवर शतक झळकावता आले नाही. तर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) लॉर्ड्सवरील रेकॉर्ड निराशाजनक आहे. रोहितनं मात्र लॉर्ड्सवरील पहिल्याच इनिंगमध्ये आत्मविश्वासनं खेळ केला. विनू मंकड, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ, रवी शास्त्री, मोहम्मद अझहरुद्दीन, सौरव गांगुली, अजित आगरकर, राहुल द्रविड अजिंक्य रहाणे  या भारतीयांच्या यादीत आता केएल राहुलचा समावेश झाला आहे. लॉर्ड्सवर शतक झळकावणारा राहुल हा दहावा भारतीय आहे.

राहुलनं शतक झळकावताच टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभं राहून त्याला मानवंदना दिली. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक बोर्डवरही आता राहुलचं नाव झळकलं आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर राहुल परतत असतानाही टीम इंडियाचे सर्व सदस्य उभे होते.त्यांनी राहुलचं अभिनंदन केलं.

IND vs ENG : रोहित शर्माचं शतक हुकलं, क्रिकेट फॅन्सनी काढला संजय मांजरेकरवर राग

राहुलनं नॉटिंघम टेस्टमध्ये 84 रनची खेळी केली होती. त्यानं तोच फॉर्म कायम ठेवत लॉर्ड्सवर शतक झळकावलं.लॉर्ड्स मैदानावर शतक झळकावणारा राहुल हा तिसरा भारतीय ओपनर आहे. यापूर्वी विनू मंकड यांनी 1952 साली तर रवी शास्त्री यांनी 1990 साली शतक झळकावले होते.

First published:

Tags: Cricket, India vs england, Kl rahul, Video viral