मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : अहमदाबादमध्ये गोंधळला टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू, तासाभरानंतर समजला प्रकार

IND vs ENG : अहमदाबादमध्ये गोंधळला टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू, तासाभरानंतर समजला प्रकार

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी टेस्ट अहमदाबादच्या मोटेरा (Motera) स्टेडियमवर होणार आहे. हे जगातलं सर्वात मोठं स्टेडियम आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी टेस्ट अहमदाबादच्या मोटेरा (Motera) स्टेडियमवर होणार आहे. हे जगातलं सर्वात मोठं स्टेडियम आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी टेस्ट अहमदाबादच्या मोटेरा (Motera) स्टेडियमवर होणार आहे. हे जगातलं सर्वात मोठं स्टेडियम आहे.

अहमदाबाद, 22 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी टेस्ट अहमदाबादच्या मोटेरा (Motera) स्टेडियमवर होणार आहे. हे जगातलं सर्वात मोठं स्टेडियम आहे. नव्यानं बांधण्यात आलेल्या या स्टेडियममध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मॅच होत आहे. 1 लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये दाखल होताच लोकल हिरो हार्दिक पांड्या (Hardik Pandya) देखील गोंधळला होता.

भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं सांगितलं की, ‘ नव्यानं तयार करण्यात आलेलं हे स्टेडियम समजण्यास मला जवळपास एक तास लागला. नोव्हेंबर 2014 नंतर पहिल्यांदाच अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय मॅच होणार आहे. सुरुवातीला या स्टेडियमची क्षमता 38 हजार होती. आता ती 1 लाख 10 हजार इतकी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मोटेरा हे प्रेक्षक क्षमतेचा विचार केला तर जगातील सर्वात मोठं स्टेडियम बनलं आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (MCG) हे सर्वाधिक प्रेक्षक क्षमतेचं स्टेडियम होतं.

(वाचा - IND vs ENG : ‘या’ तीन कारणांमुळे अहमदाबाद टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित!)

काय म्हणाला हार्दिक?

हार्दिक नव्या स्टेडियमनं चांगलाच भारवला आहे. ‘प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर खेळण्याची मी वाट पाहत आहे. सर्व खेळाडूंना हे मैदान खूप आवडलं. मला या स्टेडियमचा आकार समजण्यासाठी एक तास लागला. ज्याचं ड्रेसिंग रुम जिमला जोडलं गेलं आहे असं कोणतंही मैदान मी पाहिलेलं नाही. हे स्टेडियम बनवणाऱ्या गुजरात क्रिकेट असोसिएशनचा (GCA) मी आभारी आहे.

(वाचा - IND vs ENG : मोटेरावर कोहलीची नजर लक्ष्मणच्या स्पेशल रेकॉर्डवर!)

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये आजवर एकही आंतराष्ट्रीय मॅच झाली नसली, तरी भारत-इंग्लंड सीरिजमधील उर्वरित दोन टेस्ट आणि त्यानंतर होणाऱ्या टी-20 सीरिजमधील सर्व पाच मॅच याच ठिकाणी होणार आहेत.

First published:

Tags: Cricket news, Hardik pandya, India vs england, IPL 2021, Sports