Home /News /sport /

IND vs ENG : ‘या’ तीन कारणांमुळे अहमदाबाद टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित!

IND vs ENG : ‘या’ तीन कारणांमुळे अहमदाबाद टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित!

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी टेस्ट 24 तारखेपासून अहमदाबादमधील मोटेरा (Motera) स्टेडियमवर होत आहे.

    अहमदाबाद, 22 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी टेस्ट 24 तारखेपासून अहमदाबादमधील मोटेरा (Motera) स्टेडियमवर होत आहे. ही डे-नाईट टेस्ट असून गुलाबी बॉलमध्ये (Pink Ball) खेळली जाणार आहे. भारतामध्ये आजवर गुलाबी बॉलनं एकच टेस्ट झाली असून ती टीम इंडियानं जिंकली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील चार टेस्टची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत असून दोन्ही टीमसाठी ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. इंग्लंडची टीम या मॅचसाठी जोरदार तयारी करत असली तरी तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा विजय हा तीन कारणांमुळे जवळपास नक्की मानला जात आहे. पहिलं कारण : आजवर भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या सहा देशांमध्ये डे-नाईट टेस्ट झाली आहे. यामध्ये वेस्ट इंडिजचा अपवाद वगळता प्रत्येकानं टेस्ट जिंकली आहे. वेस्ट इंडिजची टीम टेस्ट क्रिकेटमध्ये दुबळी मानली जाते. याचाच अर्थ टॉपमधील एकाही टीमनं आपल्या घरात डे-नाईट टेस्ट गमावलेली नाही. भारतामध्ये एसजी बॉलनं, तर इंग्लंडमध्ये ड्यू बॉलनं डे-नाईट टेस्ट होते. याचाही फायदा आपल्याला होणार आहे. ( वाचा : IND vs ENG : पिचबाबत तक्रार करणाऱ्यांना रोहित शर्माने सुनावलं, म्हणाला... ) दुसरं कारण :  इंग्लंडनं मोटेरावर भारताचा एकदाही पराभव केलेला नाही. दोन्ही टीममध्ये या मैदानात दोन टेस्ट झाल्या आहेत. यापैकी एक भारतानं जिंकली असून दुसरी ड्रॉ झाली आहे. भारतीय टीमनं मोटेरावर गेल्या 13 वर्षात एकही टेस्ट हरलेली नाही. या मॅचसाठी पिच स्पिन बॉलर्सना मदत देणारी तयार केली जात आहे. आर. अश्विन आणि अक्षर पटेल यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. तिसरं कारण : टीम इंडियानं गेल्या 9 वर्षांपासून घरच्या मैदानावर एकही टेस्ट सीरिज गमावलेली नाही. या काळात सलग 12 सीरिज जिंकल्या आहेत. या दरम्यान भारतीय टीमनं बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलियास इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचा आठ टीमचा पराभव केला आहे. इंग्लंड विरुद्ध यापूर्वी भारतामध्ये झालेली पाच टेस्ट मॅचची सीरिज टीम इंडियानं 4-0 नं जिंकली होती. तर एक मॅच ड्रॉ झाली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmedabad, Cricket, India vs england, Sports, Test match

    पुढील बातम्या