IND vs ENG : मोटेरावर कोहलीची नजर लक्ष्मणच्या स्पेशल रेकॉर्डवर!

IND vs ENG : मोटेरावर कोहलीची नजर लक्ष्मणच्या स्पेशल रेकॉर्डवर!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा मैदानात बॅटिंगसाठी उतरतो तेव्हा एखादं रेकॉर्ड तरी मोडतोच. इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) तिसऱ्या टेस्टमध्येही विराट कोहलीची नजर व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) च्या स्पेशल रेकॉर्डवर असेल.

  • Share this:

अहमदाबाद, 21 फेब्रुवारी : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा मैदानात बॅटिंगसाठी उतरतो तेव्हा एखादं रेकॉर्ड तरी मोडतोच. इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) तिसऱ्या टेस्टमध्येही विराट कोहलीची नजर व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) च्या स्पेशल रेकॉर्डवर असेल. 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये तिसऱ्या टेस्टला सुरूवात होणार आहे. या मॅचमध्ये विराटने 65 रन केले, तर तो घरच्या मैदानात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप-5 मध्ये येईल. या यादीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्यासारखे दिग्गज खेळाडू आहेत.

विराट कोहलीने भारतात 41 टेस्टमध्ये 66 च्या सरासरीने 3,703 रन केले आहेत, यात 13 शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 254 रन विराट कोहलीचा सर्वाधिक स्कोअर आहे. भारतामध्ये सर्वाधिक टेस्ट रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सध्या विराट कोहली सातव्या क्रमांकावर आहे. दिलीप वेंगसरकर 3725 रनसह सहाव्या क्रमांकावर तर व्हीव्हीएस लक्ष्मण 3767 रनसह पाचव्या क्रमांकावर आहे. लक्ष्मणचं रेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला फक्त 65 रनची गरज आहे. वेंगसरकर यांनी भारतात 54 तर लक्ष्मणने 57 मॅच खेळल्या आहेत.

विराटला मागच्या 10 टेस्ट इनिंगमद्ये एकही शतक करता आलेलं नाही. दोनवेळा त्याने अर्धशतकापेक्षा जास्तचा स्कोअर केला आहे. या कालावधीमध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर 74 रन आहे. त्यामुळे विराट मोटेरा स्टेडियममध्ये त्याचा शतकांचा दुष्काळही संपवण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातली सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने शेवटच्या दोन टेस्ट खूप महत्त्वाच्या आहेत.

सचिन टॉपवर

देशात सर्वाधिक टेस्ट रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर टॉपवर आहे. सचिनने 94 मॅचमध्ये 53 च्या सरासरीने 7,216 रन केले, यात 22 शतकं आणि 32 अर्धशतकं आहेत. राहुल द्रविड (5598) दूसऱ्या, सुनील गावसकर (5067) तिसऱ्या आणि वीरेंद्र सेहवाग (4656) चौथ्या क्रमांकावर आहे.

सचिनशिवाय घरच्या मैदानात कोणत्याच भारतीय बॅट्समनला 20 पेक्षा जास्त शतकं करता आलेली नाहीत. भारतात त्रिशतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये फक्त दोन भारतीय आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि करुण नायर यांनी भारतात त्रिशतकी खेळी केली आहे. सेहवागने 2008 साली चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 319 रनची तर करुण नायरने 2016 साली चेन्नईमध्येच इंग्लंडविरुद्ध नाबाद 303 रन केले होते.

Published by: Shreyas
First published: February 21, 2021, 10:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या