मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : पहिल्या मॅचमधील पराभवानंतर विराट कोहलीची कबुली, म्हणाला...

IND vs ENG : पहिल्या मॅचमधील पराभवानंतर विराट कोहलीची कबुली, म्हणाला...

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेतील  (India vs England T20 Series) पहिल्या मॅचमधील पराभवानंतर मोठी कबुली दिली आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेतील (India vs England T20 Series) पहिल्या मॅचमधील पराभवानंतर मोठी कबुली दिली आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेतील (India vs England T20 Series) पहिल्या मॅचमधील पराभवानंतर मोठी कबुली दिली आहे.

अहमदाबाद, 13 मार्च : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेतील  (India vs England T20 Series) पहिल्या मॅचमध्ये मिळालेल्या पराभवाने नाराज झाला आहे. या पिचवर कसं खेळायचं हे आम्हाला माहिती नव्हतं, अशी कबुली विराटनं मॅचनंतर दिली आहे. 'आम्ही नीट फटके मारले नाहीत. एक बॅट्समन म्हणून या गोष्टीवर लक्ष द्यायला हवं. या मैदानावर कशा प्रकारे फटकेबाजी करायला हवी याचं नियोजन करायला हवं,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली आहे.

विराट कोहलीने यावेळी सांगितलं की, 'आमची मालिकेची सुरुवात विचित्र झाली. या पिचवर आम्ही मनाप्रमाणे फटकेबाजी करू शकलो नाही. पिचवर असमान बाऊन्स असल्याने तुम्ही क्रिजचा योग्य वापर करायला हवा. श्रेयसला हे चांगल्या पद्धतीने समजलं होतं. त्याने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली तशी फटकेबाजी इतरांना करता आली नाही. बॅट्समननी खराब खेळ केला. त्याचा फटका आम्हाला सहन करावा लागला,' अशी कबुली विराटने दिली आहे.

'खराब सुरुवातीचा फटका'

पहिल्या टी20 मध्ये भारताची सुरूवात खराब झाली होती. विराटने तो संदर्भ स्पष्ट करताना साांगितलं की, 'पिच अनुकूल असेल तर तुम्ही पहिल्या बॉलपासून आक्रमक खेळू शकता. आम्ही वेळ घेतला नाही. श्रेयसने वेळेचा योग्य वापर केला. पहिल्या 10 ओव्हर संपल्यानंतर आमचे 8 बॅट्समन शिल्लक असते, तर आम्ही मोठा स्कोअर करु शकलो असतो. त्यानंतर मॅचही चांगली झाली असती, असं विराटने सांगितलं.

( वाचा : 'प्रेक्षक रोहितचा खेळ पाहण्यासाठी येतात, तो खेळत नसेल तर मी...' नाराज सेहवागची मोठी प्रतिक्रिया )

'फॉरमॅट बदलचा परिणाम नाही'

टेस्ट क्रिकेट सातत्यानं खेळल्यानंतर टी20 क्रिकेट खेळल्याचा त्रास झाला का? असा प्रश्न विराटला यावेळी विचारण्यात आला. त्यावर विराटने सांगितलं, 'आम्हाला फॉरमॅट बदलल्याने त्रास झाला नाही. आम्ही हे पूर्वी देखील केलं आहे. यामुळे पराभव झाला असं आम्हाला वाटत नाही. आम्ही मागच्या काही टी20 मालिका जिंकल्या आहेत. यावर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपपूर्वी आमच्याकडे फक्त पाच मॅच आहेत. त्यामुळे आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. आम्ही कुणालाही कमी समजत नाही. इंग्लंडसारख्या मजबूत टीमला तर अजिबात नाही, असं विराटने यावेळी स्पष्ट केलं.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england, Sports, Team india, Test series, Virat kohli