तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारताची सुरुवात खराब झाली आहे. दुसऱ्या दिवशी 3 आऊट 99 या स्कोअरवरुन भारतानं पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर थोड्याच वेळात तीन आघाडीचे बॅट्समन आपले आऊट झाले. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 7 रन काढून सर्वप्रथम आऊट झाला. त्याला जॅक लीचनं आऊट केलं. (हे वाचा-सूर्यकुमार यादवनं 26 बॉलमध्ये काढले 120 रन! मुंबईनं केला सर्वात मोठा स्कोअर) अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर जॅक लीचनं रोहित शर्माला (Rohit Sharma) आऊट करत टीम इंडियाला मोठा धक्का दिला. रोहितनं अहमदाबादच्या फिरत्या पिचवर 66 रन काढले. सुरुवातीपासून आत्मविश्वासनं खेळणाऱ्या रोहितचा लीचला खेळण्याचा प्रयत्न फसला आणि तो आऊट झाला. आत्मविश्वासानं खेळणारा रोहित आऊट झाल्यानंतर इंग्लंडनं मॅचमध्ये कमबॅक केलं. त्यांच्या स्पिनर्सनी अचूक मारा करत भारताला मोठी आघाडी मिळवू दिली नाही. आता दुसऱ्या इंग्लंडमध्ये इंग्लंडला झटपट आऊट करण्याचं आव्हान टीम इंडियापुढे आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियमनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला ही टेस्ट गमावून चालणार नाही. तर इंग्लंडला ही टेस्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे या टेस्टमधील उर्वरित दोन इनिंग अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.Tea in Ahmedabad ☕
England take seven wickets for 46 runs in the first session to bowl India out for 145 👀 Joe Root gets his first five-wicket haul in Tests!#INDvENG ➡️ https://t.co/0unCGUOHmI pic.twitter.com/svXq65HrPF — ICC (@ICC) February 25, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Joe root, Pink ball, Team india