मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : पुणेकरांना LIVE नाही पाहता येणार शेवटची वन-डे? हे आहे कारण

IND vs ENG : पुणेकरांना LIVE नाही पाहता येणार शेवटची वन-डे? हे आहे कारण

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिजच्या सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे इंग्लंडची टीम भारत दौऱ्यातील शेवटची मॅच पुण्यात (Pune) होणार आहे. मात्र या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिजच्या सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे इंग्लंडची टीम भारत दौऱ्यातील शेवटची मॅच पुण्यात (Pune) होणार आहे. मात्र या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिजच्या सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे इंग्लंडची टीम भारत दौऱ्यातील शेवटची मॅच पुण्यात (Pune) होणार आहे. मात्र या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

मुंबई, 19 फेब्रुवारी : भारत आणि इंग्लंड या दोन्ही टीम आता चेन्नईहून अहमदाबादमध्ये दाखल झाल्या आहेत. दोन्ही टीममध्ये अहमदाबादमध्ये दोन टेस्ट आणि T20 सीरिज खेळणार आहेत. या सीरिजच्या सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे इंग्लंडची टीम भारत दौऱ्यातील शेवटची मॅच पुण्यात (Pune) होणार आहे. मात्र या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) दिलेल्या माहितीनुसार भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात पुण्यात 28 मार्च रोजी होणारी शेवटची वन-डे मुंबईत शिफ्ट होऊ शकते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गुरुवारी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यानुसार 28 मार्च रोजी होणारी शेवटची मॅच मुंबईत शिफ्ट होण्याची चर्चा सुरु असल्याचं म्हंटलं आहे. पाहुण्या टीमला ब्रिटनमध्ये जाण्यास सोयीचे व्हावे म्हणून हा बदल होऊ शकतो.  याबाबत सध्या भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाशी (BCCI) चर्चा सुरु असून त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सध्याच्या वेळापत्रकानुसार होणाऱ्या सर्व वन-डे मॅच घेण्यासाठी सज्ज आहे, असं असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकटकर यांनी सांगितलं आहे. त्यांना आता BCCI च्या अंतिम निर्णयाची प्रतिक्षा आहे. नियोजित वेळापत्रकानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन मॅचची वन-डे सीरिज पुण्यातील गंहुजे स्टेडियमवर होणार आहे. या सीरिजमधील पहिली वन-डे 23 मार्च, दुसरी 26 मार्च तर तिसरी वन-डे 28 मार्च रोजी होणार आहे.

(हे वाचा :  इंग्लंडला मोठा झटका, हा ऑलराउंडर खेळणार नाही चौथी कसोटी )

भारत- इंग्लंड यांच्यातील चार मॅचची टेस्ट सीरिज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. इंग्लंडनं पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 227 रननं पराभव केला होता. भारतानं दुसरी टेस्ट 317 रननं जिंकून फक्त सीरिजमध्ये बरोबरी केली नाही तर पहिल्या टेस्टमधील पराभवाची परतफेड देखील केली. आता या सीरिजमधील तिसरी टेस्ट 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये सुरु होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england, Maharashtra, Mumbai, Pune, Sports