Home /News /sport /

2020 ची सर्वोत्तम टी-20 टीम, विराट नाही तर या दोन भारतीयांचा समावेश

2020 ची सर्वोत्तम टी-20 टीम, विराट नाही तर या दोन भारतीयांचा समावेश

कोरोना व्हायरस (Corona Virus) मुळे यावर्षी खूप कमी प्रमाणात क्रिकेट खेळले गेलं. पण यावर्षी झालेल्या आयपीएल (IPL 2020) स्पर्धेनं क्रिकेट चाहत्यांची ही उणीव भरून काढत मनोरंजन केलं. ही आहे वर्षीची सर्वोत्तम टी-20 टीम (t-20 team of the year 2020)

पुढे वाचा ...
मुंबई, 22 डिसेंबर : कोरोना व्हायरस (Corona Virus) मुळे यावर्षी खूप कमी प्रमाणात क्रिकेट खेळले गेलं. पण यावर्षी झालेल्या आयपीएल (IPL 2020) स्पर्धेनं क्रिकेट चाहत्यांची ही उणीव भरून काढत मनोरंजन केलं. कोरोनामुळे सहा महिने कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलं नव्हतं. पण त्यानंतर अनेक देशांनी दौरे करण्यास सुरुवात करून क्रिकेट रसिकांचे मनोरंजन करण्यास सुरुवात केली. यावर्षी टी-20 क्रिकेटमध्ये अनेक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड झाले. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या खेळाडूंनी यावर्षी टी -20 मध्ये धमाका केला. आज आम्ही वर्षीची सर्वोत्तम टी-20 टीम सांगणार आहोत. यामध्ये टीम इंडियाच्या 2 खेळाडूंनी स्थान मिळवलं आहे. यावर्षीच्या सर्वोत्तम टी-20 टीममध्ये इंग्लंडचे चार, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी दोन तर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. ओपनर या टीममध्ये भारताचा के. एल. राहुल (KL Rahul) आणि इंग्लंडच्या जॉस बटलरची (Jos Butler) ओपनिंग जोडी म्हणून निवड करण्यात आली आहे. राहुल यावर्षी टी-20 मध्ये सर्वाधिक रन बनवणारा खेळाडू आहे. यावर्षी त्याने10 इनिंगमध्ये 404 रन केले असून यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. या दहा इनिंगमध्ये त्याला केवळ एका इनिंगमध्ये रन करण्यात अपयश आलं. तर जोस बटलर याने देखील यावर्षी टी-20 मध्ये उत्तम कामगिरी केली. त्याने 8 इनिंगमध्ये 150 च्या स्ट्राईक रेटने 291 रन बनवले. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध बटलरने 3 अर्धशतके केली असून त्याच्यापेक्षा जास्त सरासरी पाकिस्तानच्या बाबर आझम (Babar Azam) याची आहे. पण बाबरने चार मॅच या झिम्बाब्वे आणि बांगलादेशविरुद्ध खेळल्या. मधली फळी मधल्या फळीमध्ये इंग्लंडचा डेव्हिड मलान (David Malan), न्यूझीलंडचा केन विलियम्सन (Kane Williamson) आणि इंग्लंडचा इऑन मॉर्गन(Eon Morgan) यांची निवड करण्यात आली आहे. डेव्हिड मलान याने यावर्षी आपल्या जोरदार कामगिरीच्या बळावर टी-20 रँकिंगमध्ये पहिला नंबर पटकावला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये त्याने आपल्या बॅटिंगमुळे टीमला विजय मिळवून दिला होता. यातल्या एका सामन्यात त्याने 47 बॉलमध्ये नाबाद 99 रन केले होते. त्याचबरोबर टी-20 क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. यावर्षी त्याने 9 इनिंगमध्ये 386 रन बनवले असून त्याची सरासरी देखील 55.14 इतकी जबरदस्त होती. केन विलियम्सन(Kane Williamson) याने यावर्षी 4 इनिंगमध्ये 217 रन केले. यामध्ये 3 अर्धशतकांचा देखील समावेश होता. त्याच्या बरोबर या क्रमांकासाठी पाकिस्तानचा मोहम्मद हाफिज(Mohammed Hafeez) देखील होता. पण विलियम्सनच्या शानदार खेळामुळे त्याची निवड करण्यात आली. तर इंग्लंडचा टी-20 आणि वनडे कॅप्टन इऑन मॉर्गन याची देखील मधल्या फळीत निवड करण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स खेळण्याची क्षमता त्याच्यात असल्यामुळे मॉर्गनला संधी देण्यात आली. यावर्षी त्याने टी-20 मध्ये 238 रन केले असून या टीमचा कर्णधार म्हणून देखील त्यालाच पसंती देण्यात आली. ऑल राउंडर या टीममध्ये ऑल राउंडर म्हणून वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याची निवड करण्यात आली आहे. आपल्या ऑलराउंड कामगिरीच्या जोरावर त्याने यावर्षी 4 इनिंगमध्ये 168 रन बनवले. तर 9 विकेट देखील घेतल्या. टीम अडचणीत असताना तो आपल्या खेळाच्या बळावर टीमला संकटातून बाहेर काढत असल्याने त्याची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या ॲश्टन ॲगर (Ashton Agar) याची देखील निवड करण्यात आली आहे. यावर्षी 6 मॅचमध्ये त्याने 13 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 6.75 इतका कमी आहे. बॉलर या टीममध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या बॉलरची यामध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये इंग्लंडच्या आदिल रशीद (Adil Rashid) याची स्पिनर म्हणून निवड करण्यात आली आहे. यावर्षी झालेल्या टी-20 मॅचमध्ये त्याने 11 इनिंगमध्ये 12 विकेट घेतल्या आहेत. फास्ट बॉलरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क (Mitchel Starc) याची निवड करण्यात आली आहे. यावर्षी त्याने 8 मॅचमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 7.87 इतका कमी आहे. या टीममध्ये भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचंही नाव आहे. बुमराहचा इकॉनॉमी रेट हा केवळ 6.38 इतका आहे. या टीममध्ये बुमराह हा एकमेव भारतीय बॉलर आहे. स्टार्क आणि बुमराहशिवाय या टीममध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) यालाही स्थान देण्यात आलं आहे. यावर्षी खेळलेल्या 9 मॅचमध्ये त्याने 17 विकेट घेतल्या. थोडा जास्त इकॉनॉमी रेट असला तरीदेखील त्याच्या विकेट घेण्याच्या क्षमतेमुळे त्याची टीममध्ये त्याची निवड करण्यात आली आहे. 2020 या वर्षातील T20I टीम 1) के. एल. राहुल 2) जॉस बटलर (विकेटकिपर) 3) डेव्हिड मलान 4) केन विलियम्सन 5) इऑन मॉर्गन (कॅप्टन ) 6) कायरन पोलार्ड 7) ॲश्टन ॲगर 8) आदिल रशीद 9) मिचेल स्टार्क 10) जसप्रीत बुमराह 11) लुंगी एनगिडी
First published:

पुढील बातम्या