Home /News /sport /

Sayed Mushtaq Ali Trophy: स्पर्धा सोडून जाणारा ‘हा’ खेळाडू निलंबित!

Sayed Mushtaq Ali Trophy: स्पर्धा सोडून जाणारा ‘हा’ खेळाडू निलंबित!

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून (Sayed Mushtaq Ali Trophy) अचनाक माघार घेणं बडोद्याचा ऑल राऊंडर दीपक हुड्डाला (Deepak Hooda) चांगलंच महागात पडलं आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशननं (BCA) त्याला या देशांतर्गत सिझनसाठी निलंबित केलं आहे.

    बडोदा, 22 जानेवारी : सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून (Sayed Mushtaq Ali Trophy) अचनाक माघार घेणं बडोद्याचा ऑल राऊंडर दीपक हुड्डाला (Deepak Hooda) चांगलंच महागात पडलं आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशननं (BCA) त्याला या देशांतर्गत सीझनसाठी निलंबित केलं आहे. काही सदस्यांच्या विरोधानंतरही BCA नं हुड्डावर ही कारवाई केली आहे. 'हुड्डा या सीझनमध्ये बडोद्याचं प्रतिनिधीत्व करणार नाही, असा निर्णय मुख्य परिषदेनं घेतला आहे,' अशी माहिती BCA च्या प्रेस आणि प्रचार समितीचे अध्यक्ष सत्यजित गायकवाड यांनी दिली. BCA मध्ये दोन गट दीपक हुड्डावरील कारवाईच्या स्वरुपावरुन BCA मध्ये दोन गट पडले आहेत. 'हुड्डानं संघटनेशी चर्चा न करता टीममधून माघार घेऊन चूक केली. मात्र त्यासाठी त्याच्यावर संपूर्ण सीझन बंदी घालणं अयोग्य आहे. त्याला  समज देऊन पुढील स्पर्धा खेळण्याची परवानगी द्यायला हवी होती', असं मत BCA चे संयुक्त सचिव पराग पटेल यांनी व्यक्त केलं. (हे वाचा-ऑस्ट्रेलियाचा विजयी वीर नटराजनच्या स्वागताला बग्गी; सेहवागने शेअर केला VIDEO) काय आहे प्रकरण? या प्रकरणामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार दीपक हुड्डा आणि बडोद्याचा कर्णधार  कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्यात स्पर्धा सुरु होण्यापूर्वी स्टेडियममध्ये भांडण झालं. कृणाल पांड्याने आपल्याला सरावापासून रोखलं आणि आपल्यासोबत गैरवर्तणूक केली, असा दावा दीपक हुड्डाने केला. याबाबत त्याने बडोदा क्रिकेट असोसिएशनला ई-मेलही लिहिला आहे, ज्यात कृणाल पांड्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. कृणाल पांड्याने शिव्या दिल्यामुळे आपण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून माघार घेत असल्याचं हुड्डानं BCA ला लिहिलेल्या मेलमध्ये म्हंटलं होतं. (हे वाचा-सिराजचा खुलासा, सिडनी टेस्टमध्ये वर्णभेदी शेरेबाजीवर अंपायरने त्याला हे सांगितलं) मुश्ताक अली स्पर्धेच्या पहिल्या मॅचसाठीच्या 17 सदस्यांच्या टीममध्ये उपकर्णधार असूनही दीपक हुड्डाचं नाव नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर दबाव होता, म्हणून त्याने स्पर्धेतून माघार घेतल्याचंही बोललं जात आहे. हुड्डा हा बडोद्याचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने बडोद्यासाठी 46 प्रथम श्रेणी, 68 लिस्ट ए मॅच आणि 123 टी-20 मॅच खेळल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या