'प्रदर्शनाच्या नाही तर कनेक्शनच्या आधारावर होते सिलेक्शन' पाकिस्तानच्या माजी कॅप्टनचा आरोप

'प्रदर्शनाच्या नाही तर कनेक्शनच्या आधारावर होते सिलेक्शन' पाकिस्तानच्या माजी कॅप्टनचा आरोप

पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शोएब मलिकने (Shoaib Malik) पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) टीम निवडीमध्ये पक्षपाताचा आरोप केला आहे.

  • Share this:

लाहोर, 16 मे : पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शोएब मलिकने (Shoaib Malik) पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) टीम निवडीमध्ये पक्षपाताचा आरोप केला आहे. खेळाडूंची निवड प्रदर्शनाच्या नाही कनेक्शनच्या जोरावर केली जाते, असा आरोप शोएबनं केला आहे. झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या मालिकेत पाकिस्तानच्या  निवड समितीनं कॅप्टन बाबर आझम यानं दिलेल्या सूचनेकडं पाकिस्तानच्या निवड समिताीनं दुर्लक्ष केलं होतं. त्यानंतर शोएबनं आरोप केला आहे. हरारेमध्ये झालेल्या या टेस्ट सीरिजमध्ये पाकिस्ताननं झिम्बाब्वेचा 2-0 असा पराभव केला आहे.

शोएबनं पाक पॅशन डॉट कॉम या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा आरोप केला. ''क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच देशांमध्ये  हे प्रकार घडतात. पण, पाकिस्तानमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. कोणत्याही टीममधील खेळाडूंची निवड ही फक्त गुणवत्तेच्या आधारावर करायला हवी. कॅप्टन बाबर आझमला त्याला हवी ती टीम निवडण्याचं स्वातंत्र्य हवं.

पाकिस्तानच्या सध्याच्या टीममधील अनेक खेळाडूंना बाबरला प्लेईंग 11 मध्ये संधी द्यायची होती. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. याबद्दल प्रत्येकाचं स्वत:चं मत आहे. पण टीम निवडीच्या बाबतीत शेवटचं मत कॅप्टनचं हवं, कारण तोच या टीमसमोबत मैदानावर खेळत असतो.'' असं शोएबनं स्पष्ट केलं.

'मला पश्चाताप नाही'

पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका केल्यानंतर टीममध्ये पुनरागमन करण्याची शक्यता कमी झाल्याचं मत शोएबनं व्यक्त केलं आहे. "माझ्या नशिबात जे आहे ते कोणत्या व्यक्तीच्या नाही तर अल्लाहच्या हातामध्ये आहे. मला पुन्हा खेळायला मिळालं नाही तरी कोणताही पश्चाताप होणार नाही. मी माझ्या सहकाऱ्यांसाठी बोललो नसतो तर मला नक्की पश्चाताप झाला असता, असं शोएबनं सांगितलं.

मराठी अभिनेत्रीसोबत Affair असल्याच्या चर्चेवर ऋतुराजनं सोडलं मौन, म्हणाला...

शोएब मलिकनं शेवटची वन-डे मॅच वर्ल्ड कपमध्ये खेळली होती. भारताविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मलिक शून्यावर आऊट झाला होता. तर त्यानं शेवटची टी 20 मॅच मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात खेळली आहे. शोएबनं  287 वन-डे मध्ये 7534 रन काढले आहेत. यामध्ये 9 शतकांचा समावेश आहे. तर 116 टी 20 मध्ये त्यानं 124 च्या स्ट्राईक रेटनं 2335 रन काढले आहेत.

Published by: News18 Desk
First published: May 16, 2021, 3:31 PM IST

ताज्या बातम्या