Home /News /sport /

ICC World Cup 2011 : जेव्हा युवराजनं धोनीला वाचवलं आणि सचिन मसाज टेबलवरुन उठला नाही!

ICC World Cup 2011 : जेव्हा युवराजनं धोनीला वाचवलं आणि सचिन मसाज टेबलवरुन उठला नाही!

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या वर्ल्ड कप फायनलमधील (ICC World Cup 2011) काही गोष्टी खूप कमी जणांना माहिती आहेत. टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजेतेपदाच्या दशकपूर्तीनिमित्त आम्ही त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.

    मुंबई, 2 एप्रिल : भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी 2 एप्रिल हा खास दिवस आहे. याच दिवशी 2011 साली टीम इंडियानं दुसऱ्यांदा वर्ल्ड कप (ICC World Cup 2011 Win) जिंकला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium, Mumbai) झालेल्या या फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करुन 28 वर्षांनी वर्ल्ड कप विजतेपद पटकावले. वर्ल्ड कप फायनलमध्ये गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) 97 आणि कॅप्टन महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) यानं नाबाद 91 रन काढले होते.  भारतीय टीमनं 275 रनचं लक्ष्य 49 व्या ओव्हरमध्येच पूर्ण केले. या फायनलमधील अनेक गोष्टी आजही क्रिकेट फॅन्सना लक्षात आहेत. मात्र काही अशा घटना देखील या मॅचमध्ये घडल्या ज्या खूप कमी जणांना माहिती आहेत. वर्ल्ड विजेतेपदाच्या दशकपूर्ती निमित्तानं आम्हीच यामधील काही घटना तुम्हाला सांगणार आहोत. दोनदा झाला होता टॉस वर्ल्ड कप फायनलमध्ये दोनदा टॉस झाला होता. पहिल्यांदा टॉसच्या दरम्यान श्रीलंकेचा कॅप्टन कुमार संगकारानं काय मागितलं हे मॅच रेफ्रींना ऐकू आलं नव्हतं. त्यामुळे रेफ्री जेफ क्रो यांनी दुसऱ्यांदा टॉस करण्याचा निर्णय घेतला. संगकारानं दुसऱ्यांदा झालेला टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. युवराजनं धोनीला वाचवलं! महेंद्र सिंह धोनी हा अचूक डीआरएस (DRS ) घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण फायनल मॅचमध्ये धोनीला एक चूक करण्यापासून युवराज सिंहनं वाचवलं होतं.  39 व्या ओव्हरमध्ये युवराजच्या बॉलिंगवर समरवीरा विरुद्ध LBW चं अपिल झालं. अंपायर सायमन टॉफलनं ते अपिल नाकारलं. धोनीनं अंपायरचा तो निर्णय मान्य केला होता. पण युवराजनं धोनीला DRS घेण्याचा आग्रह केला. त्यानंतर थर्ड अंपायरनं भारताच्या बाजूनं निर्णय दिला. सचिननं जागा बदलली नाही सचिन तेंडुलकर फायनलमध्ये 18 रनवर आऊट झाला. त्यानंतर तो ड्रेसिंग रुममध्ये मसाज टेबलवरच बसला होता. सचिननं फायनल मॅचमध्ये भारताची बॅटींग पाहिली नव्हती. तो संपूर्ण दुसरी इनिंग मसाज टेबलवरच बसला. इतकंच नाही तर सचिननं सेहवागलाही त्याच्या जागेवरुन उठू दिलं नव्हतं. ( वाचा : On This Day : धोनीचा अजरामर सिक्स, सचिनचे अश्रू आणि कधीही न विसरता येणारी 'ती' रात्र ) गंभीरची झाली गडबड! भारतीय इनिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये वीरेंद्र सेहवाग आऊट झाला. मलिंगानं त्याला आऊट केले. सेहवाग आऊट झाला त्यावेळी गौतम गंभीर तयार नव्हता. त्यानं सेहवाग आऊट झाला त्यावेळी पॅड देखील बांधले नव्हते. सेहवागनं आऊट झाल्यानंतर DRS घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे गंभीरला गडबडीत तयार होता आले. त्यानंतर गंभीरनं 97 रनची अविस्मरणीय खेळी खेळली आणि भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Gautam gambhir, MS Dhoni, Sachin tendulkar, Yuvraj singh

    पुढील बातम्या