Home /News /sport /

Women's World Cup : इंग्लंडची मॅच पाहण्यासाठी पोहचली मिताली, कॅप्टनचा नवा Look Viral

Women's World Cup : इंग्लंडची मॅच पाहण्यासाठी पोहचली मिताली, कॅप्टनचा नवा Look Viral

कॅप्टन मिताली राजसह (Mitali Raj) टीम इंडियातील काही जणी मॅच पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये उपस्थित होत्या. त्यावेळी मिताली राज नव्या लुकमध्ये दिसली. मितालीचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल (New Look on Social Media) झाला आहे.

    मुंबई, 14 मार्च : महिला वर्ल्ड कपमध्ये (ICC Women's World Cup 2022) टीम इंडियाची पुढील मॅच इंग्लंड विरूद्ध होणार आहे.  16 मार्च रोजी ही मॅच (India Women vs England Women) होणार आहे. या मॅचपूर्वी भारतीय टीममधील काही जणी इंग्लंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका (ENG W vs SA W) मॅच पाहण्यासाठी गेल्या होत्या. कॅप्टन मिताली राजसह (Mitali Raj) काही जणी मॅच पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये उपस्थित होत्या. त्यावेळी मिताली राज नव्या लुकमध्ये दिसली. मितालीचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल (New Look on Social Media) झाला आहे. मिताली राजच्या कारकिर्दीमधील हा शेवटचा वर्ल्ड कप आहे. सहा वर्ल्ड कप स्पर्धा खेळणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. या वर्ल्ड कपमधील पहिल्या तीन मॅचमध्ये मितालीला फार कमाल करता आली नाही. आता आगामी मॅचमध्ये तिच्याकडून टीमच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मितालीनं इंग्लंडच्या मॅचची तयारी सुरू केलीय. त्यांच्या टीमचा अभ्यास करण्यासाठी ती स्टेडिअममध्ये उपस्थित होती. यावेळी रंगीत चष्मा आणि फ्लोअरचा शर्ट घातलेल्या मितालीचा लुक सध्या चांगलाच चर्चेत आहे. टीम इंडियानं आत्तापर्यंत या स्पर्धेत ती मॅच खेळल्या आहेत. यापैकी एक मॅच गमावली असून दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय टीमनं पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचा मोठ्या अंतरानं पराभव केला. तर न्यूझीलंड विरूद्ध 62 रननं पराभव सहन करावा लागला. आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध टीम इंडियाचे पुढील 2 सामने होणार आहेत. इंग्लंड विरूद्ध 16 मार्च रोजी तर ऑस्ट्रेलिया विरूद्ध 19 मार्च रोजी सामना होणार आहे. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी हे दोन्ही सामने महत्त्वाचे आहेत. IPL 2022 : नव्या सिझनमध्ये धोनी करणार बॉलर्सची धुलाई, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO दरम्यान, गतविजेत्या इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आहे. दक्षिण आफ्रिकेनं त्यांचा 3 विकेट्सनं निसटता पराभव केला. इंग्लंडनं पहिल्यांदा बॅटींग करत आफ्रिकेसमोर 236 रनचं टार्गेट दिलं होतं. आफ्रिकेनं 3 विकेट्स आणि 4 बॉल राखत हे टार्गेट पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे. तर इंग्लंडचा सलग तिसरा पराभव आहे. या पराभवानंतर इंग्लंडची टीम पॉईंट टेबलमध्ये बांगलादेशपेक्षाही खाली सातव्या क्रमांकावर फेकली गेली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Mithali raj, Photo viral, Team india

    पुढील बातम्या