मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : नव्या सिझनमध्ये धोनी करणार बॉलर्सची धुलाई, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO

IPL 2022 : नव्या सिझनमध्ये धोनी करणार बॉलर्सची धुलाई, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO

महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) बॅट मागील सिझनमध्ये फारशी चालली नाही. पण कॅप्टन म्हणून धोनी आजही सुपरहिट आहे. मागील सिझनमधील बॅटींगची कसर भरून काढण्यासाठी धोनी सज्ज होत आहे.

महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) बॅट मागील सिझनमध्ये फारशी चालली नाही. पण कॅप्टन म्हणून धोनी आजही सुपरहिट आहे. मागील सिझनमधील बॅटींगची कसर भरून काढण्यासाठी धोनी सज्ज होत आहे.

महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) बॅट मागील सिझनमध्ये फारशी चालली नाही. पण कॅप्टन म्हणून धोनी आजही सुपरहिट आहे. मागील सिझनमधील बॅटींगची कसर भरून काढण्यासाठी धोनी सज्ज होत आहे.

मुंबई, 14 मार्च : चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) आयपीएल स्पर्धेची जोरदार तयारी सुरू केली आहे. कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) मार्गदर्शनाखाली टीमचा स्पेशल कँप सुरतमध्ये सुरू आहे. आगामी सिझनमध्ये (IPL 2022) चॅम्पियनशिप वाचवण्यासाठी सीएसके खेळाडू जोरदार तयारी करत आहे. कॅप्टन धोनी देखील स्पर्धेसाठी सज्ज झाला असून त्याने प्रतिस्पर्धी टीमना धोक्याचा इशारा दिला आहे.

धोनीची बॅट मागील सिझनमध्ये फारशी चालली नाही. त्याने 16 मॅचमध्ये 16.29 च्या सरासरीनं 114 रन केले आहे. पण कॅप्टन म्हणून धोनी आजही सुपरहिट आहे. मागील सिझनमधील बॅटींगची कसर भरून काढण्यासाठी धोनी सज्ज होत आहे. सीएसकेनं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. टीमच्या नेट प्रॅक्टीसचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये धोनी क्रिजच्या पुढे येत बॉलर्सच्या डोक्यावरून सिक्स लगावत आहे. धोनीनं मारलेला एक सिक्स तर स्टेडियमच्या बाहेर गेला. त्यानं स्पिनर्सची केलेली धुलाई पाहून जुन्या काळातील धोनीची आठवण येत आहे.

चेन्नई सुपर किंग्सची पहिली मॅच 26 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) विरूद्ध होणार आहे. सीएसकेनं या ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022) दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, मिचेल स्टँनर, या जुन्या खेळाडूंना देखील चेन्नईनं खरेदी केले आहे. न्यूझीलंडचा बॅटर डेव्हॉन कॉनवेला (Devon Conway) चेन्नईनं 1 कोटींना खरेदी केले आहे. तो आता ऋतुराज गायकवाडसह चेन्नईचा ओपनर आहे. . दीपक चहरचा बॉलिंगमधील पार्टनर म्हणून न्यूझीलंडच्या अ‍ॅडम मिल्नेचा (Adam Milne) चेन्नईनं समावेश केला आहे. टी20 क्रिकेटमधील अनुभवी बॉलर असलेल्या इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनला (Chris Jordan) चेन्नईनं खरेदी केलं आहे.

IND vs SL : बुमराहपुढे श्रीलंकेचे लोटांगण, गावसकरांनी सांगितलं यशाचं रहस्य

चेन्नई सुपर किंग्सची संपूर्ण टीम : महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायुडू रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिस्टोरियस, अ‍ॅडम मिल्ने, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोळंकी, तुषार देशपांडे, सी. हरी निशांत, के. असिफ, शुभ्रांशू सेनापती, महेश थिकशाना, मुकेश चौधरी, नारायण जगदीशन, सिमरजीत सिंह आणि के. भगत वर्मा

First published: