मुंबई, 4 जून : टी20 क्रिकेटमधील आंतराष्ट्रीय मॅचमध्ये 11 खेळाडूंची संपूर्ण टीम फक्त 8 रनवर ऑल आऊट झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंडर 19 वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आशिया खंडातील गटाच्या पात्रता फेरीतील सामने (ICC Under-19 Women’s T20 World Cup Asia Qualifier) सध्या सुरू आहेत. या स्पर्धेतील यूएई विरूद्ध नेपाळ (UAE vs Nepal) या सामन्यात हा प्रकार घडला. या मॅचमध्ये नेपाळची संपूर्ण टीम 8.1 ओव्हरमध्ये फक्त 8 रन करून आऊट झाली.यूएईनं 9 रनचं टार्गेट फक्त 7 बॉलमध्ये पूर्ण केले.
नेपाळनं या स्पर्धेत एक दिवसापूर्वीच कतारवर 79 रननं मोठा विजय मिळवला होता. या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींगसाठी उतरलेल्या नेपाळच्या विकेट्स या रनपेक्षा अधिक वेगान पडल्या. त्यांना दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला तर तिसऱ्या ओव्हरमध्ये तीन धक्के बसले. त्यामुळे टीमची अवस्था 4 आऊट 2 अशी झाली होती. नेपाळकडून स्नेहा माहरानं सर्वात जास्त 3 रन केले. तीन जणींनी एक-एक तर एका बॅटरनं 2 रन काढले. सहा जणींना खातंही उघडता आलं नाही. यूएईकडून महिका गौरनं 4 ओव्हरमध्ये 2 रन देत 5 विकेट्स घेतल्या. तर इंदूजानं 3 आणि समायरानं 1 विकेट घेतली.
यूएईनं फक्त 7 बॉलमध्ये लक्ष्य पूर्ण केलं. कॅप्टन तीर्था सतीशनं 4 तर लावन्यानं नाबाद 3 रन केले. यूएईचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी भूतानचा 160 रननी मोठा पराभव केला होता. त्यावेळी यूएईनं पहिल्यांदा बॅटींग करत 7 आऊट 202 रन केले. त्याला उत्तर देताना भूतानची टीम निर्धारित ओव्हर्समध्ये 7 आऊट 42 रनच करू शकला.
IPL मध्ये संधी न मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरला कपिल देवनं दिला मोलाचा सल्ला
अन्य एका मॅचमध्ये थायलंडनं यजमान मलेशियाचा 85 रननं पराभव केला. थायलंडनं पहिल्यांदा बॅटींग करत 4 आऊट 133 रन केले. त्याला उत्तर देताना मलेशियाची संपूर्ण टीम 48 रनवर ऑल आऊट झाली. या स्पर्धेत एकूण 6 टीम सहभागी झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Nepal, T20 cricket