जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / U19 World Cup Final : कधी सुरू होणार IND vs ENG सामना? Live Streaming कुठे पाहाल?

U19 World Cup Final : कधी सुरू होणार IND vs ENG सामना? Live Streaming कुठे पाहाल?

U19 World Cup Final : कधी सुरू होणार IND vs ENG सामना? Live Streaming कुठे पाहाल?

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup Final) सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकणारी भारतीय टीम शनिवारी इंग्लंडविरुद्ध (India vs England) सहाव्यांदा चॅम्पियन होण्यासाठी मैदानात उतरेल. यश ढूलच्या (Yash Dhull) नेतृत्वात खेळलेल्या भारताने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 96 रनने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 फेब्रुवारी : अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup Final) सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकणारी भारतीय टीम शनिवारी इंग्लंडविरुद्ध (India vs England) सहाव्यांदा चॅम्पियन होण्यासाठी मैदानात उतरेल. यश ढूलच्या (Yash Dhull) नेतृत्वात खेळलेल्या भारताने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 96 रनने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. तर इंग्लंडने रोमांचक सामन्यात अफगाणिस्तानचा 15 रननी पराभव केला होता. मैदानाबाहेर कोरोनासोबत संघर्ष केल्यानंतर भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला, तरीही टीम डगमगली नाही. कर्णधार यश ढूल आणि उपकर्णधार शेख रशीद कोरोनामुळे 3 पैकी 2 मॅच खेळू शकले नाहीत. भारत आणि इंग्लंड यांच्यातली अंडर-19 वर्ल्ड कप फायनल भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे. एंटिगाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर हा फायनलचा मुकाबला रंगणार आहे. भारत-इंग्लंड वर्ल्ड कप फायनलचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्सवर दाखवण्यात येणार आहे. भारत-इंग्लंड मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येईल. भारतीय टीम यश ढूल (कर्णधार), शेख राशिद (उपकर्णधार), आराध्य यादव, दिनेश बाना, राज बावा, अनिश्वर गौतम, राजवर्धन हंगर्गेकर, हरनूर सिंग, मानव पारख, विक्की ओस्तवाल, अंगकृष रघुवंशी, रवी कुमार, गर्व सांगवान, सिद्धार्थ यादव, निशांत सिंधू, कौशल तांबे, वासू वत्स इंग्लंडची टीम टॉम प्रीस्ट ( कर्णधार), जॉर्ज बेल, जोशुआ बॉयडेन, एलेक्स होर्टन, रेहान अहमद, जेम्स सेल्स, जॉर्ज थॉमस, थॉमस एस्पिनवाल, नॅथन बर्नवेल, जेकब बेथेल, जेम्स कोलेस, विलियम लक्सटन, जेम्स रियू, फतेह सिंग, बेंजामिन क्लिफ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात