मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: वेस्ट इंडिजला स्पर्धेपूर्वीच मोठा धक्का, स्टार खेळाडू टीममधून आऊट

T20 World Cup: वेस्ट इंडिजला स्पर्धेपूर्वीच मोठा धक्का, स्टार खेळाडू टीममधून आऊट

गतविजेत्या वेस्ट इंडिज टीममध्ये (West Indies) अनेक टी20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश असून ही टीम यंदाही विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. मात्र या टीमला मुख्य स्पर्धेपूर्वी एक धक्का बसला आहे.

गतविजेत्या वेस्ट इंडिज टीममध्ये (West Indies) अनेक टी20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश असून ही टीम यंदाही विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. मात्र या टीमला मुख्य स्पर्धेपूर्वी एक धक्का बसला आहे.

गतविजेत्या वेस्ट इंडिज टीममध्ये (West Indies) अनेक टी20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश असून ही टीम यंदाही विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. मात्र या टीमला मुख्य स्पर्धेपूर्वी एक धक्का बसला आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर:  टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup 2021) मुख्य फेरी शनिवार पासून सुरू होणार आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिज टीममध्ये (West Indies) अनेक टी20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश असून ही टीम यंदाही विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. वेस्ट इंडिजची मुख्य फेरीतील मॅच 23 ऑक्टोबर रोजी इंग्लंड (West Indis vs England) विरुद्ध होणार आहे.  ही मॅच सुरू होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजला धक्का बसला आहे.

वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर फॅबियन एलन ( All rounder Fabian Allen ruled out of the tournament) स्पर्धेतून आऊट झाला आहे. पायला झालेल्या दुखापतीमुळे एलन या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अकील हुसेनचा  (Akeal Hosein) 15 सदस्यीय टीममध्ये समावेश करण्यास आयसीसीच्या तांत्रिक समितीनं मान्यता दिली आहे.

टी20 वर्ल्ड कपच्या नियमानुसार या स्पर्धेच्या दरम्यान एखाद्या खेळाडूचा टीममध्ये समावेश करायचा असेल तर आयसीसीच्या तांत्रिक समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे. हुसेन यापूर्वी वेस्ट इंडिजच्या टीमचा राखीव सदस्य होता. फॅबियन एलन स्पर्धेतून बाहेर पडल्यानं वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. एलननं 28 आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 138.88 च्या स्ट्राईक रेटनं 250 रन केले आहेत. तसंच 7.31 च्या इकोनॉमी रेटनं 20 विकेट्स घेतल्या आहेत. लोअर ऑर्डरमधील आक्रमक बॅटर आणि चपळ फिल्डर अशी त्याची ओळख आहे. तो आयपीएल स्पर्धेत  (IPL 2021) पंजाब किंग्ज (Punjab Kings) टीमचा सदस्य होता. त्याला आयपीएलमध्ये फार संधी मिळाली नाही.

T20 World Cup Live Streaming: IND vs AUS पाहा कधी आणि कुठे पाहता येणार मॅच?

वेस्ट इंडिजनं अकील हुसेनच्या जागी राखीव खेळाडू म्हणून एकाही आंतरराष्ट्रीय मॅचचा अनुभव नसलेल्या गुदकेश मोईटेचा (Gudakesh Moiete) समावेश केला आहे. मोईटे आता डॅरेन ब्राव्हो, जेसन होल्डर आणि शेल्डन कॉट्रेलसह टीमचा राखीव खेळाडू असेल

वेस्ट इंडिज टीम : कायरन पोलार्ड (कॅप्टन), निकोलस पूरन, ड्वेन ब्रावो, रोस्टन चेज, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, शिमरोन हेटमायर, एविन लुईस, ओबेड मकॉय, रवि रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमंस, ओशेन थॉमस, हेडन वाल्श जूनियर आणि अकील हुसेन

राखीव खेळाडू : डॅरेन ब्राव्हो, जेसन होल्डर, शेल्डन कॉट्रेल आणि गुदकेश मोईटे

First published:
top videos

    Tags: T20 world cup, West indies