• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup Live Streaming: IND vs AUS पाहा कधी आणि कुठे पाहता येणार मॅच?

T20 World Cup Live Streaming: IND vs AUS पाहा कधी आणि कुठे पाहता येणार मॅच?

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) दुसऱ्या मॅचमध्ये आज (बुधवार) भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी (India vs Australia Warmup match) होणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) दुसऱ्या मॅचमध्ये आज (बुधवार) भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी (India vs Australia Warmup match) होणार आहे. पाकिस्तान विरुद्ध 24 तारखेला होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी (India vs Pakistan, ICC T20 World Cup Match) मॅच प्रॅक्टीसची ही टीम इंडियाला शेवटची संधी आहे. यापूर्वी सोमवारी झालेल्या वॉर्म अप मॅचमध्ये टीम इंडियानं इंग्लंडचा 7 विकेट्सनं पराभव केला होता. इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये केएल राहुल (KL Rahul), इशान किशन (Ishan Kishan),  जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांनी चांगली कामगिरी केली होती. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळण्याची शक्यता आहे. इंग्लंड विरुद्ध त्याला विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंड विरुद्ध भुवनेश्वर कुमार महागडा ठरला होता. आज त्याला आणखी एक संधी असेल.  तर हार्दिक पांड्या बॉलिंग करणार का? याकडं सर्वांचं लक्ष असेल. किती वाजता सुरू होणार मॅच? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वॉर्म अप मॅच 20 ऑक्टोबर बुधवारी दुबईमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी  3.30 वाजता सुरू होणार आहे. मॅच सुरू होण्याच्या अर्धा तास आधी टॉस होईल. India vs England मॅचचं Live प्रसारण कुठे? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. जिओवरही पाहता येणार मॅच रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना आयपीएल मॅचची सुविधा देणार आहे. पोस्ट-पेड आणि प्री-पेड ग्राहकांना ही सुविधा मिळेल. T20 World Cup: ... तर हार्दिक पांड्याचा टीम इंडियाला मोठा फायदा होईल, कपिल देवनं सांगितलं कारण भारतीय टीम: विराट कोहली (कॅप्टन) रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी
  Published by:News18 Desk
  First published: