जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला धोका, ICC नं दिला गंभीर इशारा

IPL मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला धोका, ICC नं दिला गंभीर इशारा

IPL मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला धोका, ICC नं दिला गंभीर इशारा

आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला धोका असल्याचा इशारा आयसीसीचे संचालक ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांनी दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही क्रिकेट विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची टी20 लीग आहे. जगभरातील क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळतात. आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला धोका असल्याचा इशारा आयसीसीचे संचालक ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांनी दिला आहे. आयपीएलसारख्या टी20 लीगचा कालवाधी वाढत गेला तर भविष्यात आंतरराष्ट्रीय टीममधील द्विपक्षीय मालिका कमी खेळल्या जातील असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. या आयपीएल सिझनमध्ये दोन नव्या टीमची भर पडली आहे. त्यामुळे स्पर्धेतीस एकूण सामन्यांच्या संख्येत 14 नं वाढ झाली असून ती आता 74 झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेचा कालावधी हा दोन महिने झाला आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय कॅलेंडर यांच्यात संतुलन कसं राहिल असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ‘या प्रकारच्या स्थानिक स्पर्धा हा सदस्य देशांच्या अंतर्गत येणारा विषय आहे. ते त्यांच्या इच्छेनुसार या स्पर्धा घेऊ शकतात. पण, या प्रकराच्या स्पर्धेत वाढ झाली तर दीर्घकाल चालणाऱ्या या स्पर्धेचा थेट फटका आंतरराष्ट्रीय टीममध्ये होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांवर होईल. या मालिकांमधील सामन्यांची संख्या कमी होईल,’ असं बार्कले म्हणाले. बाकर्ले पुढे म्हणाले की, ‘एका वर्षात फक्त 365 दिवस असतात. त्यामध्ये खेळाडूंना आकर्षित करणाऱ्या क्रिकेट लीगची संख्या वाढली तर याचा फटका अन्य कोणत्या तरी स्पर्धेला अथवा मालिकेला सहन करावा लागेल. या लीगचा फटका आयसीसीला बसेल असं वाटत नाही. आयसीसीच्या स्पर्धा दरवर्षी होतात. या स्पर्धेत सदस्य देश सहभागी होत आहेत. त्यामुळे या लीगचा कालावधी वाढल्यास दोन देशांमधील मालिका कमी खेळल्या जातील.’ IPL 2022 : गुजरातचा एकच खेळाडू राजस्थानच्या 7 जणांवर वरचढ, रेकॉर्ड वाचून व्हाल थक्क आयसीसी संचालक बाकर्ले यांनी द्विपक्षीय मालिकेबद्दल चिंता व्यक्त केली असली तरी आपीएल स्पर्धेचंही कौतुक केलं आहे. ‘मी 2 वर्षांनंतर भारतामध्ये आल्यानं खूश आहे. आयपीएलची फायनल खेळली जाणार आहे. ही माझी आवडती स्पर्धा आहे. बीसीसीआयनं क्रिकेटसाठी मोटं काम केलं आहे. या स्पर्धेत सहभागी होणं हा प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट असते. या गोष्टीचे सर्व श्रेय बीसीसीआयला आणि भारताला आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket , icc , ipl 2022
  • First Published :
जाहिरात
जाहिरात