मुंबई, 4 जून : आयपीएलच्या यशानं प्रभावित होऊन क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच देशानं त्यांच्या टी20 लीग सुरू केल्या आहेत. टी20 क्रिकेट सामन्यांची संख्या वाढत असली तरी अनेक क्रिकेट फॅन्स आजही टेस्ट क्रिकेटला (Test Cricket) सर्वाधिक महत्त्व देतात. टेस्ट मॅच अगदी नियमित पाहतात. या सर्व फॅन्ससाठी एक वाईट बातमी आयसीसीनं (ICC) दिली आहे. आगामी काळात कसोटी सामन्यांची संख्या कमी होईल असं मत आयसीसीचे संचालक ग्रेग बार्कले यांनी दिला आहे. इंग्लड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टेस्टपूर्वी बीसीसीच्या टेस्ट स्पेशल कार्यक्रमात ते बोलत होते. ‘प्रत्येक वर्षी महिला आणि पुरूष क्रिकेटमधील एक स्पर्धा आहे. त्याचबरोबर देशांतर्गत लीगची संख्या वाढत आहे. याचे दुर्दैवी परिणम होणार आहेत. खेळाचा अनुभव तसंच महसूलावरही याचा परिणाम होणार आहे. विशेषत: भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांशी फार क्रिकेट खेळायला न मिळणाऱ्या टीमना याचा फटका बसू शकतो. येत्या 10-15 वर्षांमध्ये टेस्ट मॅच खेळाचा अविभाज्य घटक असेल पण, त्यांची संख्या कमी होईल. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांवर याचा परिणाम होणार नाही,’ असे संकेत त्यांनी यावेळी दिले. महिला क्रिकेटचा प्रश्न महिला क्रिकेटचा टेस्ट फॉर्मेट वेगानं विकसीत होत नसल्याचं मत बार्कले यांनी व्यक्त केलं. टेस्ट क्रिकेटसाठी देशांतर्गत क्रिकेटची योग्य व्यवस्था हवी. ही व्यवस्था सध्या सर्व देशांमध्ये नाही. आगामी काळातही महिला टेस्ट क्रिकेटचा विकास वेगानं होईल, असं मला वाटत नाही.’ असं बार्कले यांनी सांगितले. T20 WC Qualifier : फक्त 8 रनमध्ये संपूर्ण टीम ऑल आऊट, विरोधी टीमनं 7 बॉलमध्ये मिळवला विजय टेस्ट क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी आयसीसीनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सिझनचे विजेतेपद न्यूझीलंडनं पटकावले होते. सध्या या स्पर्धेचा दुसरा सिझन सुरू आहे. त्याचबरोबर आयसीसीकडून महसूलात वाढ होण्यासाठी दरवर्षी एक स्पर्धा घेतली जात आहे. सर्व प्रमुख देशांमध्ये टी20 लीग सुरू झाल्या आहेत. या सर्वांचा परिणाम टेस्ट क्रिकेटवर होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.