मुंबई, 18 मार्च : रंगाचा उत्सव असलेला होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. टीम इंडियाचे क्रिकेटपटू आता आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2022) तयारीला लागले आहेत. 26 मार्चपासून आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन सुरू होत आहे. या तयारीच्या दरम्यानही सर्व खेळाडू होळी उत्साहानं साजरी करत आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) होळीच्या निमित्तानं सर्व फॅन्सना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना त्याचा चांगलाच गोंधळ उडाला. रोहितची आयपीएल टीम मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) त्यांच्या सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. मैदानात प्रतिस्पर्धी टीमचे डावपेच उधळून लावणारा हुशार कॅप्टन आणि बॉलर्सची रणनीती ओळखणारा आक्रमक कॅप्टन असलेला रोहित होळीच्या शुभेच्छा देताना चांगलाच गोंधळला होता. त्यामुळे या शुभेच्छांचा व्हिडीओ शूट करताना त्याचने अनेक टेक घेतले. मुंबई इंडियन्सनं हा व्हिडीओ शेअर करत ‘ये किस लाइन मे आ गए कप्तान साहब?’ असं कॅप्शन दिलं आहे.रोहितनं या व्हिडीओसाठी तब्बल 53261 टेक घेतल्याचा माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.
Ye kis line mein aa gaye aap, Captain saab? 🤭
— Mumbai Indians (@mipaltan) March 18, 2022
After 53261 takes, Ro wishes everyone a very Happy Holi! 🤣💙#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/bb3FJj1reX
या व्हिडीओत रोहितसोबत त्याची पत्नी रितिका देखील आहे. चांगल्या टेकबाबत त्यांच्यात वादही होत आहे. मुंबई इंडियन्सनं मजेशीर पद्धतीनं हा व्हिडीओ तयार केला आहे. फॅन्स देखील या व्हिडीओचा आनंद घेत आहेत. Women’s World Cup : वेस्ट इंडिजच्या विजयाचा टीम इंडियाला फटका, वाचा कसा आहे सेमी फायनलचा मार्ग आयपीएल स्पर्धेतील पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) यांच्यात होत आहे. मुंबई इंडियन्सची पहिली मॅच 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) विरूद्ध होणार आहे.

)







