मुंबई, 14 मार्च : आयपीएल स्पर्धेच्या 15 व्या सिझनची (IPL 2022) सुरूवात 26 मार्चपासून होणार आहे. पहिल्या मॅचमध्ये विद्यमान चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सची लढत कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) विरूद्ध होणार आहे. सर्व टीमनं या स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) रविवारी जर्सी लॉन्च केली. यावेळी कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कोच आशिष नेहरा (Ashish Nehra) उपस्थित होते. हार्दिकनं मागील काही काळापासून बॉलिंग केलेली नाही. आता आगामी आयपीएल सिझनमध्ये तो बॉलिंग करणार का? हा प्रश्न सर्वांना होता. हार्दिकला यावेळी हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘हे सर्वांसाठी एक सरप्राइज असेल आणि ते तसेच ठेवा’ असं हसत-हसत उत्तर हार्दिकनं दिलं. हार्दिक मागच्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये शेवटचं खेळला होता. त्यानंतर त्याला टीममधून वगळण्यात आले. पाठीच्या ऑपरेशननंतर हार्दिकला बॉलिंग करताना त्रास होत आहे. तो मागील आयपीएल सिझनमध्ये त्याने बॉलिंग केली नव्हती. आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सची पहिली लढत लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध 28 मार्च रोजी होणार आहे. दोन्ही टीममधील ही लढत मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. मुंबईला रवाना होण्यापूर्वी गुजरातची टीम सोमवारपासून अहमदाबादमध्ये आयपीएल प्री कॅम्प सुरू करणार आहे. गुजरातनं मेगा ऑक्शनपूर्वी हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुभमन गिल यांना ड्राफ्ट केले होते. हार्दिक आणि राशिद यांना त्यांनी प्रत्येकी 15 कोटी दिले. तर शुभमन गिलला 8 कोटींमध्ये करारबद्ध केले. IND vs SL : द्रविडनं थोपटली श्रीलंकन खेळाडूची पाठ, विराटनंही केलं अभिनंदन! पाहा VIDEO गुजरात टायटन्सनं त्यांची जर्सी लॉन्च केली आहे. गडद निळ्या रंगाची ही जर्सी असून त्याच्या एका बाजूला टीमचा लोगो आहे. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांनी नवी जर्सी लॉन्च केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.