मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : द्रविडनं थोपटली श्रीलंकन खेळाडूची पाठ, विराटनंही केलं अभिनंदन! पाहा VIDEO

IND vs SL : द्रविडनं थोपटली श्रीलंकन खेळाडूची पाठ, विराटनंही केलं अभिनंदन! पाहा VIDEO

बँगलोर टेस्टच्या दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये दोन्ही टीमच्या मैत्रीचं एक दृश्य दिसलं. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यांनी श्रीलंकन खेळाडूचं अभिनंदन केलं.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 मार्च : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात बँगलोरमध्ये डे-नाईट टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या दुसऱ्याच दिवशी श्रीलंकन टीम पराभवाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. टीम इंडियानं लंकेसमोर विजयासाठी 447 रनचे टार्गेट ठेवले आहे. त्याला उत्तर देताना पाहुण्या टीमनं 1 आऊट 28 रन केले आहेत. श्रीलंकन टीम अजूनही विजयासाठी 419 रननं दूर आहे.

बँगलोर टेस्टच्या दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये दोन्ही टीमच्या मैत्रीचं एक दृश्य दिसलं. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यांनी श्रीलंकेचा फास्ट बॉलर सुरंगा लकमलचं (Suranga Lakmal) अभिनंदन केलं. लकमल त्याच्या कारकिर्दीमधील शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळत आहे. या मॅचनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करेल. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच लकमलनं ही घोषणा केली होती. टीम इंडियाच्या दुसऱ्या इनिंगच्या दरम्यान लकमल ड्रेसिंग रूमकडे जात असताना द्रविड आणि विराटनं त्याचं अभिनंदन केलं.

बीसीसीआयनं (BCCI) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. 35 वर्षांच्या लकमलनं भारताविरूद्ध डे-नाईट टेस्टमध्ये 18 ओव्हर बॉलिंग केली आणि 1 विकेट घेतली.

सुरंगा लकमला श्रीलंकन खेळाडूंनी 'गार्ड ऑफ ऑनर' दिला. यावेळी लकमल चांगलाच इमोशनल झाला होता. श्रीलंकेची टीम या सीरिजमध्ये 0-1 नं पिछाडीवर आहे. त्यांचा डे-नाईट टेस्टमधील पराभव देखील निश्चित मानला जात आहे. या टेस्टचा आणखी 3 दिवसांचा खेळ शिल्लक आहे. पण, श्रीलंकन टीम प्रत्येक रनसाठी भारतीय बॉलर्ससमोर झगडत आहेत.

भारतीय टेस्ट क्रिकेटचा सर्वात अविस्मरणीय दिवस, द्रविड-लक्ष्मणपुढे कांगारूंनी टेकले होते गुडघे!

सुरंगा लकमलनं 70 टेस्ट मॅचमध्ये 172, 86 वन-डेमध्ये 109 तर 11 टी20 इंटरनॅशनलमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 2009 साली भारताविरूद्धच्या वन-डे मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

First published:

Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Rahul dravid, Virat kohli