मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /HBD Virat Kohli: रनमशिन विराट कोहलीची सर्वात मोठी डोकेदुखी, कधी मिळणार 'तो' मौका?

HBD Virat Kohli: रनमशिन विराट कोहलीची सर्वात मोठी डोकेदुखी, कधी मिळणार 'तो' मौका?

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) आज (5 नोव्हेंबर) वाढदिवस (Happy Birthday Virat Kohli) आहे. विराट आज 33 वर्षांचा झाला आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) आज (5 नोव्हेंबर) वाढदिवस (Happy Birthday Virat Kohli) आहे. विराट आज 33 वर्षांचा झाला आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) आज (5 नोव्हेंबर) वाढदिवस (Happy Birthday Virat Kohli) आहे. विराट आज 33 वर्षांचा झाला आहे.

मुंबई, 5 नोव्हेंबर: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) आज (5 नोव्हेंबर) वाढदिवस (Happy Birthday Virat Kohli) आहे. विराट आज 33 वर्षांचा झाला आहे. वयाच्या 23 व्या वर्षी दोन वर्ल्ड कप जिंकणारा विराट नंतरच्या काळात टीम इंडियाची रन मशीन बनला. तसंच तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. विराटच्या वाढदिवशी टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडियाची महत्त्वाची लढत स्कॉटलंड विरुद्ध होणार आहे. भारतीय टीमला स्पर्धेत राहण्यासाठी ही लढत जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या दिवशी स्कॉटलंडचा पराभव करत या दिवसाला खास बनवण्याची विराटाची इच्छा असेल.

विराटनं 18 ऑगस्ट 2008 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यापूर्वी 2008 साली त्यानं अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2011 साली वन-डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा तो सदस्य होता. त्यामुळे वयाच्या 23 व्या वर्षीच त्यानं 2 मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. विराटरनं करिअरमधील पहिल्या 7 वर्षांमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये 23 शतक झळकावत स्वत:ला सिद्ध केलं. यापैकी 10 शतक त्यानं टार्गेटचा पाठलाग करताना केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज त्याच्या नावावर 23 हजारांपेक्षा जास्त रन आहेत.

सर्वात यशस्वी कॅप्टन

विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं 65 पैकी 38 टेस्ट जिंकल्या आहेत. अन्य कोणताही भारतीय कॅप्टन 30 पेक्षा जास्त टेस्ट जिंकू शकलेला नाही. महेंद्रसिंह धोनीनं 27 टेस्ट जिंकल्या आहेत. विराटचा कॅप्टन म्हणून भारताप्रमाणेच विदेशातही दमदार रेकॉर्ड आहे. त्याच्याच कॅप्टनसीखाली टीम इंडियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती.

T20 World Cup: स्कॉटलंडच्या कॅप्टनची IPL वर नजर, विराटकडं केली 'ही' मागणी

6 देशांमध्ये किमान एक टेस्ट विजय

विराटच्या कॅप्टनसीमध्ये विराटनं भारतासह 8 देशांमध्ये टेस्ट मॅच खेळली आहे. यामध्ये त्यानं 6 देशांमध्ये किमान एक टेस्ट जिंकली आहे. त्याच्या कॅप्टनसीत भारतामध्ये 30 पैकी 23 टेस्टमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला आहे. श्रीलंकेत 6 पैकी 5, वेस्ट इंडिजमध्ये 6 पैकी 4, इंग्लंडमध्ये 10 पैकी 3, ऑस्ट्रेलियात 7 पैकी 2 आणि दक्षिण आफ्रिकेत 3 पैकी 1 टेस्ट टीम इंडियानं जिंकली आहे. बांगलादेशमध्ये झालेली एकमेव टेस्ट ड्रॉ झाली. तर न्यूझीलंडमध्ये कॅप्टन कोहलीला एकही टेस्ट अद्याप जिंकता आलेली नाही. कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं 95 पैकी 65 वन-डे आणि 48 पैकी 28 टी20 सामने जिंकले आहेत.

T20 World Cup: टीम इंडियाला सेमी फायनलची अजूनही संधी, वाचा काय आहे समीकरण?

कधी मिळणार 'तो' मौका?

विराटनं त्याच्या बॅटनं अनेक रेकॉर्ड केले आहेत. टी20 इंटरनॅशनलमध्ये त्याच्यापेक्षा जास्त रन कुणीही काढलेले नाहीत. मात्र कॅप्टन म्हणून त्याला आजवर एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे अनेक जण त्याच्यावर प्रश्न उपस्थित करतात. 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 साली वन-डे वर्ल्ड कप आणि 2021 साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत विजेतेपदाच्या जवळ येऊनही टीम इंडिया पराभूत झाली. या वर्ल्ड कपमध्येही पहिल्या दोन मॅच हरल्यानंतर त्याच्यावर बरीच टीका झाली. पण, कोहलीनं कॅप्टन म्हणून विदेशात मिळवून दिलेलं यश कधीही विसरता येणार नाही.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Virat kohli