मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: स्कॉटलंडच्या कॅप्टनची IPL वर नजर, विराटकडं केली 'ही' मागणी

T20 World Cup: स्कॉटलंडच्या कॅप्टनची IPL वर नजर, विराटकडं केली 'ही' मागणी

टीम इंडियाची पुढील लढत स्कॉटलंड विरुद्ध (India vs Scotland) होणार आहे. भारतीय टीमला ही मॅच देखील मोठ्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे.

टीम इंडियाची पुढील लढत स्कॉटलंड विरुद्ध (India vs Scotland) होणार आहे. भारतीय टीमला ही मॅच देखील मोठ्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे.

टीम इंडियाची पुढील लढत स्कॉटलंड विरुद्ध (India vs Scotland) होणार आहे. भारतीय टीमला ही मॅच देखील मोठ्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे.

मुंबई, 4 नोव्हेंबर : टीम इंडियानं बुधवारी झालेल्या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा (India vs Afghanistan) 66 रननं पराभव करत या स्पर्धेतील (T20 World Cup 2021) आव्हान कायम ठेवले आहे. टीम इंडियाचा या स्पर्धेतील पहिलाच विजय आहे. आता टीमची पुढील लढत स्कॉटलंड विरुद्ध (India vs Scotland) होणार आहे. भारतीय टीमला ही मॅच देखील मोठ्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे.

स्कॉटलंडचा कॅप्टन काइल कोएत्जर (Kyle Coetzer) याने या मॅचपूर्वी विराट कोहलीकडं (Virat Kohli) एक इच्छा व्यक्त केली आहे. भारत विरुद्ध स्कॉटलंड मॅच झाल्यानंतर विराटनं आमच्या ड्रेसिंग रुममध्ये येऊन आमच्या खेळाडूंशी चर्चा करावी अशी इच्छा त्यानं बोलून दाखवली. आमच्या खेळाडूनी या वर्ल्ड कपमध्ये सर्वश्रेष्ठ खेळाडूंकडून जितकं शक्य आहे, तितकं शिकावं, असं मत त्यानं व्यक्त केलं.

भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश या टीमविरुद्ध खेळण्याचा अनुभव चांगला आहे. या टीममधील खेळाडूंकडं फक्त क्रिकेटचा नाही तर आयुष्यातील मोठे अनुभव आहेत. मला केन विल्यमसनसोबत बोलण्याची संधी मिळाली. तो या खेळाचा हिरो आहे, असं मत कोएत्जरनं व्यक्त केलं.

कोएत्जरनं न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'आम्हाला भारताविरुद्ध सर्वोत्तम खेळ करायचा आहे. आमच्या समोरचं आव्हान खडतर आहे. पण आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करु. बायो-बबलमध्ये राहणे सोपे नाही. पण, खेळाडूंनी या प्रकारातही आनंद घ्यावा,' असं आवाहन त्यानं केलं.

T20 World Cup: टीम इंडियाला सेमी फायनलची अजूनही संधी, वाचा काय आहे समीकरण?

IPL वर नजर

पुढील वर्षी आयपीएल स्पर्धेत (IPL 2022) दोन नव्या टीम सहभागी होणार आहेत. स्कॉटलंडच्या खेळाडूंनाही आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा आहे, असं कोएत्जरनं सांगितलं. जगातील कोणतीही  स्पर्धा ही  खेळाडूंना पाहण्याची आणि त्यांचं ऐकण्याची संधी असते. आमच्या टीममध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळलेले खेळाडू आहेत. पण, आयपीएलमध्ये अजून कुणी खेळलेलं नाही. पण, एक दिवस आम्ही नक्की आयपीएलमध्ये खेळू.' असा विश्वास त्यानं या मुलाखतीमध्ये बोलून दाखवला.

First published:

Tags: Cricket news, T20 world cup, Virat kohli