Birthday Special: टीममध्ये निवड होण्याकरता वडिलांकडे मागण्यात आली होती लाच, विराट कोहलीचा गौप्यस्फोट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज 32वा वाढदिवस साजरा करत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज 32वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर: आयसीसी द्वारे जारी करण्यात आलेल्या वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असणारा भारतीय  क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)आज त्याचा  32वा वाढदिवस साजरा करत आहे. 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीमध्ये त्याचा जन्म झाला. आज एका विस्फोटक आणि आक्रमक फलंदाजांमध्ये कोहलीची गणना होते. आज ज्या स्तरावर कोहली पोहोचला आहे, त्यामागे त्याची मेहनत तर आहेच पण त्याच्या वडिलांचा संघर्ष देखील आहे. ज्यांनी त्याच्या लाडक्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केलें. कोहलीची टीममध्ये निवड व्हावी याकरता त्यांच्याकडे लाच देखील मागण्यात आली होती, पण त्यांनी न डगमगता आपल्या मुलाचं स्वप्न कमजोर पडू दिलं नाही. विराटला वेळोवेळी त्यांनी पाठिंबा दिला. यावर्षी मे मध्ये स्वत: विराट कोहलीने याबाबत खुलासा केला होता की त्याच्या वडिलांकडे लाच मागण्यात आली होती. सुनील छेत्रीबरोबर केलेल्या एका इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये विराटने असा खुलासा केला होता की राज्यस्तरीय संघामध्ये निवड व्हावी याकरता त्याच्या वडिलांकडे पैसे मागण्यात आले होते. (हे वाचा-IPL 2020 : धोनीसोबतचा 4 वर्षांचा प्रवास, ऋतुराज गायकवाडने शेयर केल्या आठवणी) कोहलीने असे म्हटले की तो त्यावेळी देखील चांगला खेळ खेळत होता. त्या दरम्यान क्रिकेट बारमधील कोणीतरी एकाने वडिलांना असे म्हटले की निवड होण्यामध्ये काहीही समस्या नाही पण काही अतिरिक्त गोष्टी कराव्या लागतील. म्हणजेच ते पैसे मागत होते. कोहली असं म्हणाला की त्याला त्या व्यक्तीकडून कसली मागणी केली जात आहे ते समजले होते. पण त्याचे वडील मेहनतीच्या जोरावर वकील बनले होते आणि मेहनत करणाऱ्यांना अशी भाषा कळत नाही, अशी प्रतिक्रिया कोहलीने दिली होती.
    (हे वाचा-Happy Birthday: भारतीय क्रिकेटमधील विराट कोहलीचे असे रेकॉर्ड जे मोडणं ठरेल अशक्य) कोहलीने असे म्हटले की त्याच्या वडिलांनी त्यानंतर प्रशिक्षकांना साफ नकार दिला. स्वत:च्या बळावर जे त्यांचा मुलगा करेल तेच ठीक पण अशाप्रकारे नाही खेळायचे, अशा मताचे ते होते. विराट कोहलीने असे म्हटले की त्यावेळी तो खूप रडला होता. त्यावेळी त्याच्या वडिलांनी विराटला असे म्हटले होते की, असं काही कर जे कुणी करत नाही आहे. विराट म्हणतो की वडिलांची ही गोष्ट त्याने मनाशी कायम पक्की केली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: