Home /News /sport /

IPL वर पुन्हा फिक्सिंगचं सावट, KKR च्या माजी प्रशिक्षकावर ICC नं घातली 8 वर्षांची बंदी!

IPL वर पुन्हा फिक्सिंगचं सावट, KKR च्या माजी प्रशिक्षकावर ICC नं घातली 8 वर्षांची बंदी!

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) सुरु होऊन अजून आठवडा देखील झालेला नाही. पहिल्याच आठवड्यात या स्पर्धेवर फिक्सिंगचं सावट पसरलं आहे.

    दुबई, 14 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) सुरु होऊन अजून आठवडा देखील झालेला नाही. पहिल्याच आठवड्यात या स्पर्धेवर फिक्सिंगचं सावट पसरलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) माजी बॉलिंग कोच हीथ स्ट्रीकवर आठ वर्षांची बंदी  (Heath Streak Ban) घालण्यात आली आहे. झिम्बाब्वेचा माजी कॅप्टन आणि फास्ट बॉल बॉलर असलेल्या  स्ट्रीकवर भ्रष्टाचार विरोधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही आयसीसीनं (ICC) ही कारवाई केली आहे. आयसीसी अँटी करप्शन कोडच्या पाच नियमांचं उल्लंघन केल्याची कबुली स्ट्रीक यांनी दिली आहे. काय आहे प्रकरण? झिम्बाब्वेच्या महान बॉलर्सपैकी एक असलेला हीथ स्ट्रीकवर 2017 आणि 2018 मध्ये झालेल्या अनेक मॅचच्या संदर्भात संशय होता.  प्रशिक्षक म्हणून भ्रष्टाचार विरोधी नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएल, बांगलादेश, अफगाणिस्तान प्रीमियर लीगमधील लढतींचा यामध्ये समावेश आहे. हीथ स्ट्रीक या काळात कोलकाता नाईट रायडर्स  टीमचाही बॉलिंग कोच होता. त्यानं त्याची चूक कबुल केली आहे. आता तो 8 वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटशी संबंधित गोष्टींमध्ये भाग घेऊ शकणार नाही. स्ट्रीकची कारकीर्द हीथ स्ट्रीकनं झिम्बाब्वेसाठी 65 टेस्ट आणि 189 वन-डे मॅच खेळल्या आहेत. उजव्या हातानं फास्ट बॉलिंग टाकणाऱ्या स्ट्रीकनं 216 टेस्ट आणि 239 वन-डे विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्यानं टेस्टमध्ये 1990 तर वन-डेमध्ये 2942 रन काढले. स्ट्रीक 2005 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला. त्यानंतर तो इंग्लंडमधील क्रिकेट क्लबचा कॅप्टन होता. ( वाचा : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूच्या आईचं कोरोनानं निधन ) क्रिकेटला अलविदा म्हंटल्यानंतर स्ट्रीक यांनी प्रशिक्षक म्हणून करियर सुरु केलं. जगातील अनेक टीमचे ते प्रशिक्षक होते. स्ट्रीक 2009 ते 2013 या काळात झिम्बाब्वेचे बॉलिंग प्रशिक्षक  होते. तसंच 2016 साली ते टीमचे मुख्य प्रशिक्षक होते. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमची त्यांनी 2018 सााली बॉलिंग प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. फिक्सिंगचे प्रकरण देखील याच काळातील आहेत. त्यामुळे आता आयपीएल स्पर्धेवरही फिक्सिंगचं सावट आलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Icc, KKR

    पुढील बातम्या