Home /News /sport /

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूच्या आईचं कोरोनानं निधन

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूच्या आईचं कोरोनानं निधन

टीम इंडियाला 2012 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा स्पिनर हरमीत सिंह (Harmeet Singh) याची आई परमजीत कौर यांचं कोरोनामुळे निधन झालं.

    मुंबई, 14 एप्रिल : कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून त्याच्या पेशंट्सची संख्या वेगानं वाढत आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी अनेक राज्यांनी कठोर निर्बंध जारी केले आहेत. या निर्बंधानंतरही कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे भारताच्या फास्ट बॉलरच्या आईचं निधन झालं आहे. या घटनेमुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. टीम इंडियाला 2012 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा स्पिनर हरमीत सिंह (Harmeet Singh) याची आई परमजीत कौर यांचं कोरोनामुळे निधन झालं. हरमीत राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) आयपीएल देखील खेळला आहे. हरमीतनं 31 फर्स्ट क्लास, 19 लिस्ट A आणि 7 टी20 मॅच खेळल्या आहेत. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 87, लिस्ट A क्रिकेटमध्ये 21 तर टी20 क्रिकेटमध्ये 3 विकेट्स घेतल्या. त्यानं 2009 साली मुंबईकडून त्रिपुरा विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो त्रिपुराकडूनही क्रिकेट खेळला. 11 एप्रिल 2013 या दिवशी त्यानं राजस्थान रॉयल्सकडून पुणे वॉरियर्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं पहिल्याच मॅचमध्ये रॉस टेलरला आऊट केलं होतं (वाचा : पाकिस्तानी क्रिकेटपटूचा झिम्बाब्वेला जायला नकार, कारण ऐकून हैराण व्हाल! ) दिल्लीच्या बॉलरला कोरोना दरम्यान, राजस्थान रॉयल्स  विरुद्धच्या मॅचच्या एक दिवसआधी दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा फास्ट बॉलर एनरिक नॉर्कियाला (Enrich Nortje) कोरोनाची लागण झाली आहे. कसिगो रबाडा (Kagiso Rabada) याने देखील नॉर्खियाबरोबर सात तासांचा प्रवास एकत्र केला होता, मात्र त्याची कोरोना चाचणी  निगेटिव्ह आली आहे. दोन्ही खेळाडू सध्या मुंबईमध्ये क्वारंटाइन आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Covid-19, Cricket news

    पुढील बातम्या