मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'टीम इंडियातील गर्विष्ठ संस्कृती नष्ट करा', माजी कोचचं गांगुली आणि द्रविडला पत्र

'टीम इंडियातील गर्विष्ठ संस्कृती नष्ट करा', माजी कोचचं गांगुली आणि द्रविडला पत्र

डब्ल्यू. व्ही. रमन (WV Raman) यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना पत्र लिहून टीममधील गर्विष्ठ संस्कृती बदलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

डब्ल्यू. व्ही. रमन (WV Raman) यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना पत्र लिहून टीममधील गर्विष्ठ संस्कृती बदलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

डब्ल्यू. व्ही. रमन (WV Raman) यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना पत्र लिहून टीममधील गर्विष्ठ संस्कृती बदलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

मुंबई, 15 मे :  भारतीय क्रिकेट टीममधील (Team India) वाद काही नवे नाहीत. यापूर्वी भारताच्या पुरूष टीममधील अनेक वाद उघड झाले आहेत. यंदा महिला क्रिकेट टीममध्ये (Team India Women) वाद निर्माण झाला आहे. या टीमचे मावळते कोच डब्ल्यू. व्ही. रमन (WV Raman) यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना पत्र लिहून टीममधील गर्विष्ठ संस्कृती बदलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. रमननं या ई-मेल ची कॉपी नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनाही पाठवली आहे.

माजी क्रिकेटपटू मदनलाल यांच्या क्रिकेट सल्लाग समितीनं (CAC) गुरुवारी रमन यांच्या जागी रमेश पोवरची महिला टीमचे मुख्य कोच म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर रमन यांनी सविस्तर पत्र लिहून टीममधील परिस्थितीची गांगुलींना कल्पना दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत वारंवार संपर्क साधूनही रमन यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

ई मेलमध्ये काय आहे?

टीम इंडियाच्या दोन माजी कॅप्टनला लिहिलेल्या ई मेलमध्ये रमन यांनी महिला टीममधील स्टार कल्चरवर सविस्तर भाष्य केलं आहे. यामुळे टीमचा फायदा कमी आणि नुकसान जास्त होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.  'एखाद्या माजी खेळाडूचा श्वास या संस्कृतीमुळे कोंडला जात असेल तर त्यांनी (गांगुली) टीम इंडियाचा माजी कॅप्टन या नात्यानं या प्रकरणावर निर्णय घ्यायला हवा. कोचची ही मागणी जास्त आहे का?' असा सवाल रमन यांनी विचारला आहे.

वसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर

रमन यांनी या पत्रात कोच म्हणून अधिक सक्रीय नसण्याचा आरोप देखील फेटाळला आहे. 'मागच्या वर्षी टी 20 लीगमध्ये संयुक्त अरब अमिरातमधील गरम वातावारणात दुपारी एक ते रात्री नऊ पर्यंत आपण तीन टीमला प्रशिक्षण दिलं होतं, याची आठवण रमन यांनी करुन दिली आहे.

बीसीसायचे अध्यक्ष आणि सचिव यांनी आरोपांवर स्पष्टीकरण मागितलं तर आपली बाजू सविस्तर मांडू, असंही रमननं यांनी सांगितलं. महिला क्रिकेटचा रोडमॅप तयार करण्यासाठी राहुल द्रविड योगदान देऊ शकतो, असा विश्वास असल्यानं त्यांनी या ई मेलची प्रत द्रविडला देखील पाठवली आहे.

First published:

Tags: Cricket, Rahul dravid, Sourav ganguly, Team india