जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / वसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर

वसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर

वसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर

इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) नेहमी वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असतो. वॉननं शुक्रवारी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर (Virat Kohli) टीका केली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 मे : इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) नेहमी वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असतो. वॉननं शुक्रवारी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर (Virat Kohli) टीका केली होती. या टीकेला माजी भारतीय क्रिकेटपटू आणि पंजाब किंग्जचा बॅटींग कोच वसीम जाफरनं (Wasim Jaffer) चोख उत्तर दिलं आहे. जाफरनं अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याचं नाव घेत मायकल वॉनला ट्रोल केलं आहे. काय म्हणाला होता वॉन? वॉननं शुक्रवारी न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन  (Kane Williamson) याच्या खांद्यावरुन टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर (Virat Kohli) निशाणा साधला. ‘विल्यमसन भारतीय असता तर तो जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला असता, पण विराट कोहली असेपर्यंत तो कधीही सर्वोत्तम खेळाडू ठरणार नाही, कारण तो भारतीय नाही,’ असं वॉननं म्हंटलं होतं. ‘माझ्या मते विल्यमसन तीन्ही प्रकारात सर्वोत्तम आहे. पण तो विराट कोहलीची बरोबरी करु शकत नाही. कारण, त्याचे इन्स्टाग्रामवर 100 मिलिअन फॉलोअर्स नाहीत, त्याच्याकडं जाहिराती नाहीत. त्यामुळे तो भक्कम कमाई करत नाही. सर्व जण विराटबद्दल चांगलं बोलतात. त्यामुळे त्याचे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढतात. विल्यमसन ज्या पद्धतीनं खेळतो. मैदानावर त्याचं वर्तन शांत आणि संयमी असते. ही खरंच कमाल आहे.’ असा दावा वॉननं केला आहे. जाफरनं दिलं उत्तर वासीम जाफरनं वॉनच्या या टीकेला चोख उत्तर दिलं आहे. ‘ऋतिक रोशनकडं अतिरिक्त बोट आहे,.पण काड्या नेहमी मायकल वॉन करतो.’ या शब्दात जाफरनं वॉनला उत्तर दिलंय. जाफरचं हे उत्तर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल (Viral) झालं आहे.

News18

मनोज तिवारीचं अभिनंदन करताना हरभजननं सांगितली कडवट गोष्ट न्यूझीलंड जून महिन्यात इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट खेळणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनलनंतर भारतीय टीम इंग्लंड विरुद्ध पाच टेस्टची मालिका खेळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात